राज्यात आज दिवसभरात दुपटीहून अधिक रूग्ण करोनातून बरे झाल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. राज्याती करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. मात्र तरी देखील दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कधी जास्त तरी कधी कमी आढळून येत आहे. मात्र आज राज्या आढळलेल्या करोनाबाधितां पेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या ही दुपटीहून अधिक आढळल्याचे दिसून आले आहे. आज दिवसभरारत राज्यात ११ हजार ७७ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ४ हजार ८७७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज ५३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६९,९५,१२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,६९,७९९ (१३.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०१,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८८,७२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.