मुंबई महानगरपालिका वळगता इतर ९ महानगरपालिकेत भाजपच मोठा पक्ष ठरला आहे. २१ फेब्रुवारीला पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून सोलापूर, अकोला, अमरावती, उल्हासनगर तिन्ही महालिकेत भाजपच मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला सोलापूर, अकोला, अमरावतीमध्ये यशाची अपेक्षा होती आणि त्याचप्रमाणे विजय मिळवण्यात भाजप यशस्वी ठरली.

उल्हासनगर, सोलापूर, अकोला अशा एकूण दहा महानगर पालिकांसाठीचे मतदान २१ फेब्रुवारीला पार पडले. उल्हासनगरमध्ये ५० टक्के सोलापूरमध्ये ६० टक्के, अमरावतीत ५५ टक्के, अकोल्यात ५६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे या महापालिकांवर कोणत्या पक्षाची सत्ता असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते हे चित्र आता स्पष्ट झालं असून जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे.

Nagpur Lok Sabha constituency, nitin gadkari vs congress, Eknath shinde and Devendra fadnavis vs sunil kedar, ramtek lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, Nagpur news, ramtek news, Nagpur Lok Sabha hot topic, lok sabha election result,
शिंदे, फडणवीस विरुद्ध केदार, रामटेकचा निकाल ठरवणार कोण भारी ?
Nanded, VVPAT, axe,
नांदेड : व्हीव्हीपॅट, इव्हीएम मशिन कुर्‍हाडीने फोडली
Kolhapur, Hatkanangle, election battle,
कोल्हापूर, हातकणंगलेत चुरस वाढली
hatkanangale lok sabha
कोल्हापुरात प्रचाराचा धुरळा; हातकणंगलेत वारे थंडच

उल्हासनगरमध्ये त्रिशंकू लढत पाहायला मिळाली. उल्हासनगरमध्ये ७८ जागा असून ‘साई’ हा स्थानिक पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे . उल्हासनगर पालिकेत सेनेची सत्ता होती. दुपारपर्यंत सेना- भाजपमध्ये टक्कर पाहायला मिळाली. सेनेच्या पारड्यात कौल झुकलेला असताना क्षणार्धात इथले चित्र पालटले. ७८ जागांपैकी भाजप ३२ तर सेना २५ जागांवर विजयी ठरली आहे. राष्ट्रवादी ४, काँग्रेस ४, आरपीआय २, भारिप १, रिपाइं १ आणि साई ११ जागांवर विजयी ठरली आहे.

सोलापूर महापालिकेमध्ये पहिल्यांदाच कमळ फुललं आहे. आधी येथे काँग्रेसची सत्ता होती त्यामुळे निवडणुकीसाठी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहूमत मिळता आले नाही. पण सोलापूरमध्ये भाजपाला ४८ जागांवर विजय मिळला आहे. सेनेनेही भाजपला येथे चांगली टक्कर दिली. त्यामुळे सोलापूरात शिवसेना भाजप अशी लढत पाहायला मिळाली. सोलापूरात शिवसेना २१ जागांवर विजय मिळवत दुसरा मोठा पक्ष ठरला तर सत्तेत असलेल्या काँग्रेसला १४ जागा मिळवत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. एमआयएमने ९ जागांवर विजय मिळवला.

अकोला महापालिकेत २० प्रभागातील ८० जागांसाठी ५७९ उमेदवारांचे भविष्य ठरले.  अकोला महापालिकेत भाजप शिवसेनेची सत्ता होती पण संध्याकाळपर्यंत भाजप आणि काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली. अकोल्यात भाजप ४८ जागांवर, काँग्रेस १३, शिवसेना ८, एमआयएम १, अपक्ष, राष्ट्रवादी ५ विजयी झाले आहेत. त्यामुळे अकोल्यात भाजपा मोठा पक्ष ठरला आहे. अमरावतीमध्ये ८७ जागांसाठी ६२६ उमेदवारांचे भविष्य पणाला लागले होते. अमरावती महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे पण भाजपाने मात्र या दोन्ही पक्षांचा धुव्वा उडवला. पहिल्याच फेरीत भाजपा आघाडीवर पाहायला मिळाली. अमरावतीत सध्या ४५ जागांवर भाजप विजयी झाली आहे.

६.०० : सोलापूरमध्ये पहिल्यांदाच भाजपला घवघवीत यश

५. ३४ : अमरावतीत ४० जागांवर भाजपची आघाडी

५.३० : अकोल्यात भाजप ४८ जागांवर, काँग्रेस १३, शिवसेना ८, एमआयएम १, अपक्ष, राष्ट्रवादी ५  विजयी

५.२९ : अकोला महापालिका एकूण ८० जागांचे निकाल जाहिर, भाजप ठरला मोठा पक्ष

५.२५ : उल्हासनगर भाजप ३२ तर सेना २५ जागांवर विजयी

५.१९ : सोलापूर महानगरपालिका एकूण १०२ जागांचे निकाल हाती

५. १८ : उल्हासनगर मधे सर्व जागांचे निकाल घोषित

५.१६ : सोलापूर महानगरपालिका एकूण ९३ जागांचे निकाल हाती

५.१५ : सोलापूर भाजपाचे ४६ उमेदवार विजयी

५.०० : उल्हासनगर सत्तेची चावी ‘साई’ आणि ‘रिपाइं’ कडे

४.५१ : अमरावतीमध्ये ३७ जागांवर भाजपची आघाडी

४.३० : सोलापूर, अमरावती, अकोलामध्ये भाजप आघाडीवर

४.१७ : अमरावतीमध्ये २४ जागांवर भाजपची आघाडी

४.०६ : सोलापूर प्रभाग ७ मध्ये सेनेचे चारही उमेदवार विजयी

४.०४ : सोलापूर प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपचे संगीता जाधव राजेश काळे, अश्विनी चव्हान,  राजश्री बिराजदार विजयी

३. ५० : अमरावतीमध्ये ५५ पैकी ३५ जागांवर भाजप आघाडीवर

३.३४ : उल्हासनगरमध्ये ३३ जागांवर भाजप, तर २१ जागांवर सेनेची आघाडी

३. २९ : सोलापूरमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल,  फक्त ७ जागांची गरज

२.५७ : सोलापूर महापालिकेत एमआयएमचा ८  जागांवर विजय

२.५० : सोलापूर विद्यमान महापौर सुशीला आबुटे पराभूत

२.४९ :   उल्हासनगर शिवसेना १६  काँग्रेस १ तर राष्ट्रवादी ४ ठिकाणी आघाडीवर

२.४३ : उल्हासनगरमध्ये २७ जागांवर भाजप आघाडीवर

२. ३८ : अकोला महापालिकातेली एकूण ६० जागांपैकी ३१ जागांवर भाजप आघाडीवर

२.२९ :  अकोल्यात ४८ जागांपैकी १८ जागांवर भाजपाची आघाडी

२.२७ : उल्हासनगरमध्ये भाजपाची आघाडी

२.२६ : सोलापूर प्रभाग ७ ची मतमोजणी सर्वात शेवटी घेणार असल्याची माहिती आयुक्त तसेच निवडणूक मुख्य अधिकारी विजयकुमार काळम पाटील यांची माहिती

१. ४९ : अमरावती, अकोल्यात भाजपचे पारडे भारी

१. ४८ : सोलापूरात भाजप, शिवसेनेत चुरशीचा सामना

१. ४३ : सोलापूर प्रभाग १० मधून शिवसेना पॅनेल विजयी,  प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, सवित्रा सामल, मीराबाई गुर्रम विजयी उमेदवार

१.३३ : उल्हासनगर प्रभाग १८ मध्ये शिवसेना आणि भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराला समान मतं

१. ३१ : अकोला महापालिका प्रभाग १६ मधून  राष्ट्रवादीचे ४ उमेदवार विजयी

१. २७ : उल्हासनगर प्रभाग १९ मधून भाजपचे किशोरी वनवारी, मीना सोंडे, मीनाक्षी पाटील, विजय पाटील विजयी, विजय पाटील आणि मीना सोंडे यांनी भाजपात प्रवेश केल्याने सेनेला धक्का

१.२५ : उल्हासनगर प्रभाग १९ मध्ये मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का

१.२१ : अमरावतीत एमआयएम ने खाते उघडले प्रभाग क्रमांक ४ मधून एक जागा जिंकली

१.१९ : अकोलामध्ये भाजप २०, काँग्रेस ९ आणि राष्ट्रवादी ३ ठिकाणी आघाडीवर

१.०९ : सोलापूरमध्ये  शिवसेनेचे गणेश वाणकर ,गुरुषांत धुत्तरगावकर, देवेंद्र कोठे विजयी

१.०७ : अकोल्यात एमआयएमने खाते उघडले

१.०६ : उल्हासनगर प्रभाग १० मध्ये  शिवसेनेचे चारही  उमेदवार विजयी

१.०४ : अकोला महापालिका प्रभाग १० मधून भाजपचे ३ आणि शिवसेनेचा १ उमेदवार विजयी

१.०१ : अकोला महापालिका प्रभाग ६ मध्ये  भाजपचे ४ उमेदवार विजयी

१२. ४८ : अमरावतीत काँग्रेस महापौर चरणजितकौर नंदा यांना पराभवाचा धक्का

१२. ४२ : अमरावतीत भाजप ३७ जागांवर आघाडीवर

१२. २८ : सोलापूरमध्ये एमआयएमने खाते उघडले

१२. २७ : उल्हासनगरमध्ये २४ जागांवर शिवसेना आघाडीवर

१२. २५ :  अकोला महापालिकेत आता पर्यंत एकूण २४ जागांपैकी ११ जागांवर भाजप, ६ जागांवर काँग्रेस, ५ जागांवर भारिप बमस आणि राष्ट्रवादी, अपक्षचे १ उमेदवार आघाडीवर

१२. २२ : अकोला महापालिका प्रभाग १२ मध्ये भाजपचे ४, प्रभाग १४ मधून भारिपचे ३ आणि भाजपचा १ उमेदवार विजयी

१२. २० : अमरावतीमध्ये भाजप ८, शिवसेना १, तर काँग्रेस १ जागेवर आघाडीवर

१२. ०८ : अमरावतीमध्ये प्रभाग १९ मधून काँग्रेसच्या उमेदवार महापौर रिना नंदा पराभूत

१२. ०७ : सोलापूरमध्ये अमर पुदाले,  शोभा बनशेट्टी, सोनाली मुटकिरी, नागेश भोगडे विजयी

१२. ०४ : सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपा चारहीचे उमेदवार विजयी..

११.४९ : सोलापूरमध्ये भाजप १४ आणि  शिवसेना १२ जागांवर आघाडी घेताना

११. ४७ : अकोला महापालिका  प्रभाग ११ मधून काँग्रेस ३ जागांवर तर  अपक्ष १ जागेवर विजयी

११. ४६ : अकोला प्रभाग ८ मधून भाजपाचे भिरड तुषार महिंद्र, विंचनकर रंजना श्याम, पाटील नंदा अनंतराव, क्षीरसागर सुनील हरिभाऊ विजयी

११. ४२ :  अकोला प्रभाग ३ ‘अ’ मधून भाजपचे हरिष काळे, ‘ब’ मधून भाजपच्या गितांजली शेगोकार विजयी तर ‘क’मधून भारिपचे बमसं धनश्री देव आणि ‘ ड’ मधून बमसं महादेव उर्फ बबलू जगताप विजयी

११. ३७ : अकोला महापालिका प्रभाग ३ मधून भाजप २ आणि भारिपचे २ उमेदवार विजयी

११.३५ : अकोल्यात काँग्रेसची ३ जागांवर आघाडी दिसून येतेय

११.३२ : अमरावतीमध्ये भाजपची पहिल्या फेरीअखेर २८  पैकी १५ जागांवर आघाडी

११.३० : अकोल्यात प्रभाग १ अ मधून राष्ट्रवादीचे रहीम पेंटर विजयी

११. २१ : उल्हासनगरमध्ये सेनेचे ४ उमेदवार विजयी

११. १९ : अकोलामध्ये  प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपचे २ आणि भारिपचा १ उमेदवार विजयी

११. १५ : अमरावतीमध्ये ४ ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर

११. १४ : अकोल्यामध्ये भाजप ७ ठिकाणी आघाडीवर

११.१२ : उल्हासनगरमध्ये प्रभाग क्रमांक सहामधून भाजपचे चारही उमेदवार विजयी

११. ०७ : उल्हासनगरमध्ये  शिवसेनेचे ३ उमेदवार आघाडीवर

११. ०६ :  अकोल्यात प्रभाग क्रमांक आठमधून भाजपचे तुषार भिरड, राजेंद्र विंचनकर, नंदा पाटील, सुनील क्षीरसागर विजयी

११. ०३ :  सोलापूर प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपाचे चारही उमेदवार आघाडीवर

११. ०१ : अमरावतीमध्ये भाजप २, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर

११.०० : अकोल्यात प्रभाग क्रमांक आठ मधून भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर

१०. ५२  : उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीचे  सुनीता बगाडे, भरत गंगोत्री, सतराम जेसवानी, पूजा कौर लाभाना,  उमेदवार विजयी घोषित

१०. ५१ : उल्हासनगर प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादीचे  ४ उमेदवार विजयी

१०. ५० : उल्हासनगर प्रभाग १४ मधून  राष्ट्रवादीचे  ४ उमेदवार आघाडीवर

१०. ४८ : अकोल्यात भाजपचे उमेदवार आघाडीवर

१०.४१ : उल्हासनगरमध्ये प्रभाग १० मध्ये शिवसेना उमेदवार पुढे

१०.३९ : अकोल्यात भाजप – राष्ट्रवादी अशी दुहेरी लढत असू शकते

१०.३५ : अकोल्यात खदान गोदाम येथे मतमोजणी सुरु

१०. २१ : सोलापूरमध्ये प्रभाग ८मध्ये  भाजपाचे शोभा बनशेट्टी,  अमर पुदाले भाजपा पहिल्या फेरीत  पुढे

१०. २० : सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक ८वर भाजपा आघाडीवर

१०. १६: सोलापूरमध्ये भाजपाच्या बाजूने पहिला कौल

१०. १२ : अमरावती पहिल्या टप्प्यात ७ प्रभागांची मतमोजणी होणार आहे

१०.०९ : अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

१०. ०१ : उल्हासनगरमध्ये ५० %, सोलापूरमध्ये ६० %, अमरावतीत ५५ %, अकोल्यात ५६ % मतदानाची नोंद झाली होती

१०.०० : उल्हासनगर, अमरावती,  अकोला, सोलापूरमध्ये मतमोजणीला सुरूवात

९.५५ : सोलापूरात काँग्रेसची  सत्ता पणाला, स्पष्ट बहुमत मिळणार की त्रिशंकू स्थिती निर्माण

९. ५२ : थोड्याच वेळात सोलापूरमध्येही मतमोजणीला सुरूवात, आज चार लाख एक हजार ३९६ मते मोजली जाणार आहेत

९. ५० : उल्हासनगर महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी अर्धशिक्षित उमेदवारांना स्थान दिल्याचे समोर आले होते. ४७९ उमेदवारांपैकी २१४ उमेदवार हे दहावीपर्यंतही शिकले नव्हते

९. ४५ : ओमी कलानींशींची प्रतिष्ठा पणाला

९. ४० : उल्हासनगरमध्ये शिवसेना, भाजप आणि साई पक्षात तिरंगी लढत पाहायला मिळेल

९.३५ : उल्हासनगर ५० टक्के मतदान पार पडले होते, २० प्रभागांमध्ये ७८ जागांसाठी यंदा ४७९ उमेदवार रिंगणात आहेत

९.३० : थोड्याचवेळात उल्हासनगर, अमरावती,  अकोला, सोलापूरमध्ये मतमोजणीला सुरूवात