जम्मू-काश्मीरमधील कथुआ जिल्ह्य़ात दहशतवाद्यांनी शुक्रवारी एका पोलीस ठाण्याला लक्ष्य केले. लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या या आत्मघातकी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. त्यात वाईचे सूरज मोहिते (२४) यांचा समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल या पदावर सूरज कार्यरत होते. सूरज यांच्या निधनाचे वृत्त समजताच वाई शहरावर शोककळा पसरली.
लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी सहाच्या दरम्यान जम्मू-पठाणकोट मार्गावरील एक जीप अडवली. जीप तपासणीच्या नावाखाली अडवलेली जीप या दहशतवाद्यांनी पळवली. त्यात तीन जण होते. नंतर दहशतवाद्यांनी ही जीप कथुआ जिल्ह्य़ातील राजबाग पोलीस ठाण्याकडे वळवली. पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हातबॉम्ब फेकून बेछूट गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तर बेछूट गोळीबारात सात जवान जखमी झाले. या हल्ल्याला सीआरपीएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. चकमक उशिरापर्यंत सुरू होती. अखेरीस दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. मात्र, हल्ल्यात सूरज मोहिते यांच्यासह आणखी दोन जवान शहीद झाले. तर एक नागरिक मृत्यूमुखी पडला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दहा जण जखमी झाले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जम्मू-पठाणकोट महामार्ग बंद करण्यात आला आहे.
काश्मिरातील हल्ल्यात वाईचा जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील कथुआ जिल्ह्य़ात दहशतवाद्यांनी शुक्रवारी एका पोलीस ठाण्याला लक्ष्य केले. लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या या आत्मघातकी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-03-2015 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wai crpf soldier killed militants attack kathua police station