प्रसिद्ध लेखिका आणि कवियित्री कविता महाजन यांचे निधन झाले आहे. पुण्यातील चेलाराम रुग्णालयात वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ब्र, भिन्न आणि कुहू या कादंबऱ्या ही त्यांची विशेष ओळख होती. साहित्य अकादमी पुरस्काराच्या त्या मानकरी होत्या.

५ सप्टेंबर १९६७ रोजी त्यांचा नांदेड येथे जन्म झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य विषयात एम.ए. केले होते.

neena kulkarni
“मी जिवंत आहे”, निधनाची अफवा पसरल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची पोस्ट, म्हणाल्या…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Old man died in school bus hit, Old man died in school bus hit Borivali, Borivali latest news,
बोरिवलीमध्ये बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
maharashtrachi hasyajatra team congratulates prithvik pratap married to prajakta vaikul
पृथ्वीक प्रतापच्या आयुष्यात आली प्राजक्ता! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिल्या शुभेच्छा; शिवाली परब म्हणाली…
dr tara bhawalkar honored with loksatta durga lifetime achievement award
माणसातील जनावर अजूनही जिवंत आहे; डॉ. तारा भवाळकर यांची स्पष्टोक्ती ;‘ लोकसत्ता दुर्गां’चा गौरव सोहळा
rangoli artist gunvant Manjrekar
रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर यांचे निधन
Woman poisons boyfriend thinking he would inherit ₹252 crore.
Woman poisons Boyfriend : २५२ कोटींसाठी बॉयफ्रेंडवर विषप्रयोग, हत्या झाल्यानंतर गर्लफ्रेंडवर पश्चातापाची वेळ! नेमकं काय घडलं वाचा
political twist in the suicide of a professional DJ
भंडारा : डीजे व्यावसायिकाच्या आत्महत्येला राजकीय वळण

अंबई : तुटलेले पंख, आग अजून बाकी आहे, आगीशी खेळताना, आबा गोविंदा महाजन : बालसाहित्य आकलन आणि समीक्षा, कुमारी माता, कुहू, ग्राफिटीवॉल ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. याशिवाय बकरीचं पिल्लू : जंगल गोष्टी, पाच पुस्तकांचा संग्रह हे त्यांचे नावाजलेले बालसाहित्य आहे.  तत्पुरुष, धुळीचा आवाज, म्रृगजळीचा मासा हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह आहेत.

महाजन यांना २००८ सालचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. तसेच कवयित्री बहिणाई पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी त्यांना २०११ मध्ये साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार देण्यात आला होता.