बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे सुनील राणे विजयी झाले आहेत. भाजपाने विनोद तावडे यांना धक्का देत त्यांच्याजागी सुनील राणे यांना उमेदवारी दिली होती. विनोद तावडे बोरीवलीमधून आमदार होते. पण भाजपाने त्यांचे तिकीट कापले व सुनील राणे यांना उमेदवारी दिली.

सुनील राणे वरळीमध्ये राहतात. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे इथून निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघ पूनर्रचनेआधी वरळी विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे होता. त्यावेळी सुनील राणेंनी इथून निवडणूक लढवली होती. पण त्यांना यश मिळाले नव्हते.

बोरीवलीच्या ज्या मतदारसंघात सुनील राणेंना उमेदवारी देण्यात आली होती. तो भाजपाचा बालेकिल्ला आहे. गेली कित्येक वर्ष इथला मतदार भाजपाच्या पाठिशी उभा राहिला आहे.

घाटकोपर पूर्वमधून भाजपाचे पराग शाह विजयी झाले आहेत. भाजपाने यावेळी प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून पराग शाह यांना उमेदवारी दिली होती.

Story img Loader