पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस तर्फे शिवाजी काळुंगे तर राष्ट्रवादी तर्फे काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर युतीमध्ये हि जागा रयत क्रांती संघटनेला सोडण्यात आली असून माजी आ.सुधाकरपंत परिचारक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यात आघाडी झाली असली तरी काँग्रेस आणि रसष्ट्र्वादीने उमेदवार जाहीर केल्याने घोळ झाला आहे. तर दुसरीकडे युतीतर्फे सुधाकरपंत परिचारक यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि रिडालोसचे भारत भालके यांच्या निवडणूक झाली. यात भालके विजयी झाले. त्यानंतर २०१४ साली काँग्रेसकडून भारत भालके,स्वाभिमानी संघटनेकडून प्रशांत परिचारक तर समाधान अवताडे यांनी सेनेकडून निवडणूक लढवली. याही निवडणुकीत भालके विजयी झाले.मात्र या निवडणुकीत आ.भालके यांनी काँग्रेसला हात दाखवला. पक्षच्या मुलाखतीला पाठ फिरवत भाजप मध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले. अखेरीस भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारी जाहीर झाली. त्याच वेळी काँग्रेस पक्षाकडून शिवाजी काळुंगे यांचे नाव दिल्ली येथून जाहीर झाले. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची आघाडी झाली असताना इथे मात्र विरोधात अर्ज दाखल केला.

Eknath Shinde and Ajit Pawar group will not get a single Lok Sabha seat says Sachin Sawant
लोकसभेची एकही जागा एकनाथ शिंदे, अजित पवार गटाला मिळणार नाही; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा दावा
Ranajagjitsinha Patil sharad pawar
“आमदार नसतानाही राणाजगजीतसिंह पाटलांना मंत्री केलं, पण त्यांचे…”, शरद पवार यांचा टोला
Deputy Chief Minister Ajit Pawar also applied for Lok Sabha from Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?
Amol Kolhe, Dilip Mohite, Shirur,
शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी

तर दुसरीकडे सलग ५ वेळा पंढरपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेले स्वछ आणि जनसामान्यांचे नेते म्हणून ओळख असलेले जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना युतीच्या कोट्यातील रयत क्रान्ति संघटनेची उमदेवार जाहीर झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी परिचारक यांनी मोठे शक्ती प्रदर्श केले. येथील टिळक स्मारक मैदानावर सभेचे आयोजन केले होते. या सभेला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंत्री सदाभाऊ खोत,सेनेचे मंत्री तानाजी सावंत,खा. रणजित निंबाळकर,माजी खा. विजयसिंह मोहिते पाटील आदी दिग्ग्ज नेते उपस्थित होते. तर मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते उस्त्फुर्तपणे सहभागी झाले.

आणखी वाचा- … त्यानंतरच उपमुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पहावं; आर.आर.पाटलांच्या कन्येचा आदित्यना टोला

या मतदारसंघातून गेल्यावेळेस सेनेकडून लढलेले समाधान अवताडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता आघाडीतून दोन उमेदवार रिंगणात आहेत.तर दुसरीकडे जिल्ह्यातील दिग्ग्ज नेते आणि राजकारणाचा पूर्वानुभ पाहता सुधाकरपंत परिचारक यांचे पारडे जाड आहे असे म्हण्टले तर वावगे ठरणार नाही.

मोहिते-परिचारक १० वर्षानंतर पुन्हा एकत्र

विजयसिंह मोहिते पाटील यांनी २००९ साली पंढरपूर मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सुधाकर परिचारक उपस्थित होते. मात्र या निवडणुकी नंतर त्यांचे संबध बिघडले. जिल्ह्यात एकेकाळी मोहिते आणि परिचारक यांची हुकुमत होती. ते दोघे पुन्हा एकत्र आल्याने परीचारकांचे पारडे जड झाले आहे