गंगाखेड शुगर आíथक घोटाळ्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेले रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुट्टे यांनी २०१४ सालीही या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मागील वेळी गुट्टे यांनी आपली स्वतची संपत्ती ६९ कोटी रुपये दर्शविली होती. या वेळी त्यात वाढ झाली आहे. आपली स्थावर व जंगम मालमत्ता ८७ कोटी ५५ लाख रुपयांची असल्याचे गुट्टे यांनी नमूद केले आहे. जिल्ह्यतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून गुट्टे या रिंगणात आहेत.

कोटय़धीश गुट्टे केवळ आठवी इयत्ता शिक्षित असले, तरी उद्योगाच्या जोरावर त्यांनी निर्माण केलेले साम्राज्य व संपत्तीचे आकडे कोटींच्या घरात आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत आपल्याकडे ५६ कोटी १८ लाख ८६ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून पत्नी सुदामती यांच्याकडे ४४ कोटी ९० लाख १ हजार ६०४ रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे विवरण गुट्टे यांनी दिले होते. गेल्यावेळी पती-पत्नीकडील जंगम मालमत्तेचा आकडा १०० कोटींहून अधिक होता. गुट्टे यांच्या स्थावर मालमत्तेचा आकडा त्यावेळी १३ कोटी ६३ लाख ५० हजार रुपये होता. तर पत्नीच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता १० कोटी ६६ लाख रुपयांची दर्शविण्यात आली होती. एकूण मालमत्तेचे चालू बाजारमूल्य तेव्हा २४ कोटी २९ लाख ५० हजार रुपये असल्याचे दर्शविण्यात आले होते. यावेळी या आकड्यांमध्ये वाढ  झाली आहे.

akshay bam
सूरतपाठोपाठ इंदूरमध्ये माघारनाट्य, काँग्रेस उमेदवाराकडून अर्ज मागे ; लोकशाहीला धोका असल्याचा पक्षाचा आरोप
amravati lok sabha, Bachchu Kadu,
महायुतीतील बच्‍चू कडूंचे राजकीय भवितव्‍य पणाला!
Deputy Chief Minister Ajit Pawar also applied for Lok Sabha from Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?
former leader of the opposition Dattatraya Waghere withdrawal nomination form
मावळमध्ये ठाकरे गटात बंडखोरी? माजी विरोधी पक्षनेत्याने घेतला उमेदवारी अर्ज

गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्ससह कुंदर गुड्स, शेअर्स गुट्टे इन्फ्रा. प्रा. लि., सीन इंडस्ट्रीज लि. एम.आय.डी.सी. बुट्टीबोरी नागपूर आदी कंपन्यांमध्ये शेअर्सद्वारे गुंतवणूक, बंधपत्रे, ऋणपत्रे अशा मालमत्तेच्या मोठ्या आकड्यासह. राष्ट्रीय बचत योजना, पोस्टातील बचती, विमापत्रे आदी गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात पाच वर्षांपूर्वी दर्शविली होती. गुट्टे यांच्याकडील चल संपत्तीचे मूल्य ५६ कोटी १८ लाख ८६ हजार १३ रुपये, तर पत्नीच्या नावे असलेल्या चल संपत्तीचे मूल्य हे ४४ कोटी ९० लाख १ हजार ६०४ रुपये आहे, असे  गुट्टे यांनी नमूद केले होते.

दैठणा घाट, टोकवाडी (ता. परळी), मरगळवाडी, सुरळवाडी, बनिपपळा, सुप्पा, वागदेवाडी, अकोली (गंगाखेड) वडगाव, वैतागवाडी (सोनपेठ), खापरखेडा (जिल्हा हिंगोली) ठिकाणी  शेतजमीन, नागपूर, मुंबई आदी ठिकाणी निवासी इमारत, नागपूर येथील प्लॉटचे  बाजारमूल्य ४ कोटींच्या घरात असून अन्य ठिकाणच्या सदनिकांच्या किमतीही लाखोंच्या घरात आहेत. पती-पत्नीच्या नावे असलेल्या सर्व स्थावर मालमत्तेचे बाजारमूल्य २४ कोटी २९ लाख ५० हजार रुपये आहे. बँका वित्तीय संस्थांचे कर्ज, देय रकमा हा आकडाही मोठा आहे. गुट्टे यांच्या नावे तो १६ कोटी ३२ लाख ८२ हजार ७४६, तर पत्नीच्या नावे ११ कोटी ५९ लाख ८७ हजार ५२५ रुपये आहे. दोघांकडील एकूण देणी २७ कोटी ९२ लाख ७० हजार २७१ रुपये होती, अशी माहितीही गुट्टे यांनी गेल्या निवडणुकीत शपथ पत्राद्वारे दिली होती. गुट्टे यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे.

या वेळी गुट्टे यांनी जंगम संपत्ती ८२ कोटी पाच लाख रुपये दर्शविली असून स्थावर संपत्ती पाच कोटी ४९ लाख एवढी दर्शविली आहे. १९ कोटी ३४ लाख रुपयांचे कर्ज त्यांनी नमूद केले आहे. वीस लाख रुपये किंमतीची होंडा अकॉर्ड, सतरा लाख रुपये किंमतीची स्कोडा लाव्हरा, पस्तीस लाख रुपये किंमतीची लँडरोव्हर, पंधरा लाख रुपये किंमतीची संताफी कार आदी वाहने गुट्टे यांच्याकडे आहेत. पत्नीच्या नावे तीन कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तर ४९ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता गुट्टे यांनी या वेळी दर्शविली आहे. गतवर्षी दर्शविलेल्या मालमत्तेत या वेळी वाढ झाल्याचे दिसून येते.

सध्या मुक्काम तुरुंगात

गंगाखेड शुगर्स या साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावे शेकडो कोटी रुपयांचे कर्ज परस्पर उचलल्याप्रकरणी रत्नाकर गुट्टे सध्या तुरुंगात आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्जही केला होता. मात्र खंडपीठाने गुट्टेंचा अर्ज फेटाळला.