शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना सोमवारी वरळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आदित्य हे पहिले ठाकरे ठरले आहेत. अशात आता वरळीतील गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी म्हणजेच अर्थात शिवसेनेने केला आहे. ‘केम छो वरली!’ असा प्रश्न विचारणारे आदित्य ठाकरे यांचे पोस्टर वरळी नाक्यावर झळकले आहे. मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कांसाठी लढणारी सेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेने आता गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजरातीमध्ये पोस्टर लावल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल नेटवर्किंगवर या शिवसेनेच्या गुजराती प्रेमावरुन चांगलीच टीका होताना दिसत असून अनेकांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना ट्रोल केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनेही या पोस्टचा फोटो ट्विट केला आहे.

केम छो वरली या आदित्य ठाकरे यांच्या पोस्टरबाबत सोशल मीडियावर चांगलीच टीका होते आहे.अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरुन शिवसेनेच्या गुजराती पोस्टरचा समाचार घेतला आहे. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले ट्विट…

१)
मराठी माणसाला झालयं काय?

२)
मी भाजपा समर्थक तरी

३)

१०० गुजराती मते मिळवली पण…

४)

मराठी माणसावरील अविश्वास

५)

हारले पाहिजेत

६)

स्वाभिमानाने बोला.. केम छो वरळी

७)

विचार करा

८)

हेच सांगायचा प्रयत्न

९)

चलो अंबरनाथ

१०)

गुजरातमधील वरळी

११)

वरळीचा नवा पत्ता

१२)

तेव्हा गुजराती शिकवली

१३)

मराठी माणसा जागा हो

१४)

मराठी हक्कासाठी…

१५)

वाघ आता ढोकळा खायला लागला

१६)

गुजरातीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवसेनेने केवळ गुजरातीमध्येच नाहीत तर तमीळ, इंग्रजी, मराठी भाषांमध्येही असे पोस्टर वरळीमध्ये लावले आहेत असा युक्तीवाद शिवसेनेचे समर्थक इंटरनेटवर करताना दिसत आहेत.