नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर ते परत महाराष्ट्रात परतणार का? असा सवाल केला जात असताना, आपण राष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे गडकरी यांनी स्वत: स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी २०१४ च्या विधानसभा निवडणुका गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज (गुरूवार) नागपुरात केले.
काल (बुधवार) अध्यक्षपदासाठीचे सोपस्कर पार पडल्यानंतर आज सकाळी अकरा वाजता गडकरी नागपूरात दाखल झाले. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर गडकरी पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याचे दिसत होते. कार्यकर्त्यांसमोर बोलताना गडकरींनी आयकर खात्यावर आणि कॉंग्रेसवर कडाडून टिका केली.  
नितीन गडकरींच्या मालकीच्या पूर्ती उद्योगसमूहाशी संबंधीत आयकर विभागाने छापे घातल्यानंतर विरोधकांकडून होणा-या टिकेला सामोरे जावे लागू नये म्हणून मंगळवारी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजनाथ सिंह यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्य़क्षपदी निवड करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा