राज्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास मंडळात झालेल्या घोटाळ्याची राज्यभर चर्चा असताना जिल्हा व्यवस्थापक सुग्रीव गोपाळ गायकवाड व लिपीक सुजित शंकर पाटील या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध १ कोटींचा अपहार केल्याची तक्रार हिंगोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. महामंडळाचे अधिकारी दत्तात्रय मगर यांनी गैरव्यवहाराबाबतची माहिती पोलिसांना दिली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात ३८५ कोटी रुपयांचा राज्यभर घोटाळा झाल्याची सर्वत्र चर्चा गाजत आहे. िहगोली येथील अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कार्यालयातसुद्धा बनावट कर्ज प्रकरण तयार करून १ कोटींचा अपहार केल्याचे आता उघडकीस आले आहे. आरोपी सुग्रीव गायकवाड आणि सुजित पाटील या दोघांनी २ जुल २०१४ ते २९ जानेवारी २०१५ या कालावधीत खोटी व बनावट कागदपत्र सादर केली व १ कोटींचा अपहार करून कागदपत्र गहाळ केल्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी िहगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून महामंडळाच्या खात्यातून ३० लाखांचा धनादेश परस्पर काढून घेतला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता तसेच कॅशबुकमध्ये त्याची नोंद न घेता एकत्रित १ कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. मागासवर्गीयांसाठीच्या निधीचा दुरुपयोग करून लाभार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक व आíथक विकासापासून वंचित ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याबाबत लेखापरीक्षक दत्तात्रय मगर (लातूर) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जात पुढे नमूद केले की, सुग्रीव गायकवाड व सुधीर पाटील हे दोघे िहगोली जिल्हा कार्यालयात काही वर्ष कार्यरत होते. त्या काळात त्यांनी साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी केंद्र, राज्य सरकार व नवी दिल्ली येथील अनु.जाती राष्ट्रीय विकास मंडळ यांच्याकडून आलेल्या निधीचा आपल्या फायद्यासाठी उपयोग केला आहे.

Story img Loader