कवठेमहांकाळ नजीक लांडगेवाडी येथे एस.टी.बस व मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात १ जण ठार तर ३ जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी झालेल्या या अपघातातील जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
सांगलीतील काळे कुटुंबीय मारुती कार (एम एच ०४ डीसी १३००) मधून जतहून सांगलीकडे येत होते. त्याचवेळी मिरजेकडून पंढरपूरला जाणाऱ्या बस (एम एच १२ सीएच ७९५२) या वाहनाशी धडक झाली. यामध्ये रुद्राप्पा शिदलिंग काळे हा जागीच ठार झाला. या अपघातात आण्णा काळे, विठ्ठल काळे व सचिन काळे हे तिघे जण जखमी झाले असून त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader