अलिबाग – महाड येथील सावित्री नदीतील गाळ उपश्याचे काम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात १ लाख ९२ हजार ४०० घनमीटरचा गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरीत गाळ काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
सावित्री नदीची पूर समस्या लक्षात घेऊन शासनाने नदीपात्रातील गाळ उपश्याला सुरवात केली आहे. पूर निवारण कार्यक्रमाआंतर्गत हे काम केले जात आहे. जलसंपदा विभागामार्फत गेल्या वर्षी सावित्री, काळ, गांधारी, भावे नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने गाळाचे सर्वेक्षणही केले होते. यात नद्यामध्ये अंदाजे २६ लाख ५० हजार घनमीटर गाळ साचला असल्याचे समोर आले होते. यापैकी २०२२ मध्ये १० लाख ५ हजार घनमीटर गाळ काढण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आले होते. अद्यापही १५ लाख ९१ हजार घनमीटर गाळ नदी पात्रात शिल्लक आहे. त्यामूळे यावर्षी राज्यशासनाने गाळ उपश्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
म्हणजेच गेल्या वर्षी जवळपास ४० टक्के गाळ काढण्यात आला होता. सिआरझेड परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने आणि नंतर पावसाला सुरवात झाल्याने हे काम थांबविण्यात आले होते. आता उर्वरीत ६० टक्के गाळ काढण्याच्या कामाला पुन्हा एकदा सुरवात झाली असून महिन्याभरात १ लाख ९२ हजार ४०० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सावित्री नदी आणि तिच्या उपनद्यामंध्ये एकाच वेळी १७ ठिकाणी गाळ उपसायचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ पोखलेन मशीन ७ जेसिबी मशिन्स ८० डंपरच्या साह्याने हा गाळ उपसा सुरू करण्यात आला आहे.
पावसाळा सुरु व्हायला अद्यापही सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे या कालावधीत जास्तीत जास्त गाळ उपसा करणे गरजेचे आहे. अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात गाळ शिल्लक असल्याने हे काम पूर्ण करणे आव्हानात्मक असणार आहे. नदीपात्रातील गाळाची बेटे हटविल्यामुळे महाडची पूर समस्या बऱ्याच प्रमाणात निकालात निघेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. दर आठवड्याला गाळ उपश्याचा प्रांताधिकारी कार्यालयामार्फत आढावा घेतला जात आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त गाळ उपसण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे, असे नायब तहसीलदार सुरेश खोपकर म्हणाले.