पालघर : पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नावे बनावट लेटरहेड तयार करून त्याचा वापर करत मोखाडा तालुक्यात सुमारे १० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळवण्यात आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाला समर्थन देणारे जिल्हा परिषद सदस्य तसेच जव्हार अर्बन बँकेचे चेअरमन हबीब शेख यांना जव्हार पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यांमधून जव्हार- मोखाडा- त्र्यंबकेश्वर तसेच मोखाडा- विहिगाव- खोडाळा असे दोन प्रमुख मार्ग असून या मार्गांवर गेल्या काही वर्षांत किमान ४०० ते ५०० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. अशा परिस्थितीत हबीब शेख यांनी खासदार यांचे लेटरहेड छापून मोखाडा- विहिगाव- खोडाळा या भागात सुमारे १० कोटी रुपये किमतीच्या कामांना नव्याने मंजुरी मिळवली. या कामांना अर्थसंकल्पीय मंजुरी मिळून प्रसिद्ध झाल्यानंतर ही बाब खासदारांच्या निदर्शनास आली.

हेही वाचा – मला मुख्यमंत्री बनवायला निघाले की फटाके बांधायला? आमदार वडेट्टीवार व धानोरकर यांच्या भर सभेत एकमेकांना कोपरखळ्या

याप्रकरणी खासदार गावित यांनी चौकशी केल्यानंतर बनावट लेटरहेडसह त्यांच्या खोट्या सह्या, राजमुद्राचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात खासदारांचे स्वीय सहाय्य यांच्या माध्यमातून पालघरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात जव्हार पोलिसांनी हबीब शेख यांना मध्यरात्रीनंतर अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा – दादा भुसे आणि आदित्य ठाकरेंची नाशकात गुप्त भेट? जयंत पाटील म्हणाले, “सगळीच माणसं आपल्या…”

बोगस कागदपत्रांच्या आधारे 30 कोटींवरील काम संपन्न

जव्हार नगरपरिषद तसेच जवाहर व मोखाडा तालुक्यात पर्यटन व रस्त्यांच्या कामांसाठी बनावट तांत्रिक मान्यतेच्या आधारे किमान ३० कोटी रुपयांची कामे झाली असल्याचे लोकसत्ताने प्रसिद्ध केले आहे. या प्रकरणी तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी २८ कोटी रुपयांच्या गैरप्रकारांचा अहवाल सादर केला असला तरी या प्रकरणात महसूल वा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पालघर पोलिसांकडे दिली गेली नसल्याने या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. या अहवालाच्या अनुषंगाने तक्रार दाखल झाल्यास कारवाई करू असे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी लोकसत्ताला सांगितले. मात्र या प्रकरणात गुंतलेली मंडळी यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे आरोप होत आहेत.