Petrol And Diesel Rate In Marathi : देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती सकाळी सहा वाजता जाहीर करतात. आज १० फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील इंधनाचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तुमच्या शहरांतील पेट्रोल व डिझेलचा भाव वाढला की कमी झाला हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता.

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol And Diesel Rate )

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.१७९०.७१
अकोला१०४.११९०.६८
अमरावती१०४.५५९१.१०
औरंगाबाद१०५.३७९१.८६
भंडारा१०४.१४९१.६७
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०४.६८९१.२२
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.०२९०.५६
गडचिरोली१०४.४९९१.५४
गोंदिया१०५.००९१.७२
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०५.५०९२.०३
जालना१०५.५९९२.१२
कोल्हापूर१०४.७३९१.२७
लातूर१०४.८४९१.३६
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.६१९१.१५
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.८१९१.३३
नाशिक१०४.९७९१.४७
उस्मानाबाद१०४.५१९१.०५
पालघर१०४.०७९०.५७
परभणी१०५.५९९२.०२
पुणे१०३.९६९०.४९
रायगड१०३.७५९०.२७
रत्नागिरी१०५.५०९१.००
सांगली१०४.४५९१.८४
सातारा१०५.३६९१.३९
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.५८९१.११
ठाणे१०४.३७९०.८६
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.८९९१.४२
यवतमाळ१०४.७५९१.३०

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादीवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. तर आज महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाचे दर स्थिर आहेत, तर काही शहरांत किंचित दर कमी झाल्याचे दिसून आले आहे.

सध्याच्या डिजिटल जगात अनेक गोष्टी मोबाईलवरून अगदी सहज केल्या जातात. मग अगदी पैसे काढायचे असो किंवा एखादी मिटिंग अटेंड करायची असो. तर तुम्ही घर बसल्या आता एसएमएसद्वारे पेट्रोल-डिझेलचे दर सुद्धा जाणून घेऊ शकता. तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

सेकंड हॅण्ड कारच्या खरेदीनंतर त्याची काळजी कशी घ्याल?

सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते अगदी त्याचप्रमाणे गाडी खरेदी केल्यानंतरही वर्षानुवर्षे गाडीचे नुकसान होणार नाही यासाठी काही गोष्टी जाणून घेणेसुद्धा महत्त्वाचे असते.

१. सर्व्हिस हिस्ट्री इन्स्पेक्शन (Service History Inspection)

कारच्या सर्व्हिस रेकॉर्डस् व ओनरशिप हिस्ट्रीचे पुनरावलोकन करणे, गाडीची स्थिती समजून घेणे या बाबी गाडीसंबंधित आधीच्या कोणत्या समस्या आहेत का हे ओळखण्यास मदत करतात अधिकृत डीलरकडून व्हेरिफाईड रेकॉर्ड प्रदान केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ- योग्य देखभाल ही बाब वाहनाच्या मेंटेनन्समध्ये कोणतेही अंतर नाही ना याबद्दलचा विश्वास प्रदान करतो.

२. इंजिन आणि ट्रान्स्मिशन केअर

इंजिनाला वाहनाचे हृदय, असे संबोधले जाते. कारण- इंजिन गाडीच्या हालचालींना सामर्थ्य देते. त्यामुळे इंजिन सुरळीत चालते आहे ना हे सुनिश्चित करण्यासाठी नियमित फिटनेस तपासणी करणे आवश्यक आहे. चांगल्या कार्यक्षमतेसाठी इंजिनामध्ये योग्य वायुप्रवाह सुनिश्चित करण्यासाठी दर १५ ते ३९ किमी (15k to 30k) मैलांवर एअर फिल्टर बदला. गाडीचा टायमिंग बेल्ट किंवा चेन बदलण्यासाठी मॅन्युफॅक्चरर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आणि नियमितपणे इंजिन ऑईल बदला.