युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना स्वत: आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
त्यांच्या भाषणातले 10 मुद्दे
1) गेली ५० वर्ष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जे तुम्ही प्रेम दिले हेच प्रेम तुम्ही मला देणार आहात. हेच प्रेम मी पुढे घेऊन जाणार आहे.
2) मला जेव्हा जेव्हा कोणी विचारलं की तू काय करू शकतोस मी त्यांना उत्तर दिले की मी राजकारण करू शकतो.
3) मला माझ्या आजोबांची शिकवण आहे की, 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण.
4) आपले प्रेम आणि आपले आशीर्वाद सोबत आहेत कारण मी फार मोठी झेप घेत आहे.
5) महाराष्ट्रभर मी फिरत आहे जो लोकांचा आवाज माझ्या पर्यंत पोहचत नाही तो आवाज तुम्ही माझ्याकडे पोहोचवायचा आहे.
6) वरळी विकास तर आपण करून परंतु महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचा आहे.
7) निवडणूक लढवायची हा निर्णय माझ्या स्वप्नांसाठी नाही आहे तर नवा महाराष्ट्र घडवायचा आहे त्यासाठी आहे.
8) हीच ती वेळ आहे कर्जमुक्त महाराष्ट्र, प्रदूषण मुक्त महाराष्ट्र, बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र हिरवागार सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायची.
9) शिवसेना ही पूर्ण महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा ठाणे खानदेश,पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र रायगड-कोकण सगळीकडे नेण्याची.
10) सर्वांनी हा तुमचा हात वर करा , पहा यात मला कुठेही भेदभाव दिसत नाही आहे हीच वेळ आहे सर्वांनी एकजुटीने एकत्र येण्याची.