अलिबाग- रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकून पडले होते. यातील १० विद्यार्थी जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. तर आणखी ८ विद्यार्थी हे रोमानियात तर सात हंगेरीत दाखल झाले आहेत. हे विद्यार्थी उद्या भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
आर्यन पाटील, अभिजीत थोरात, पुर्वा पाटील, यश काळबेरे, प्रेरणा दिघे, अद्वैत गाडे, सालवा सलीम महम्मद धनसे, प्रचिती पवार, मोहम्मद करीम शेख, अनुजा जायले हे दहा विद्यार्थी सुखरूप भारतात परतले आहेत. उर्वरीत २२ विद्यार्थ्यांपैकी ८ जण रोमानियात तर ७ जण हंगेरीतील बुडापिस्ट येथे पोहोचले आहेत. २ जण स्लोवाकीया, १ जण रशियन सिमेवर पोहोचला आहे. त्यामुळे हे सर्वजण येत्या दोन दिवसात सुखरूप परतणे अपेक्षित आहे.
युक्रेन मध्ये अडकूल पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अलिबाग येथे आपत्ती व्यवस्थापन कक्षात मदत कक्ष कार्यान्वयीत करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांशी दररोज संपर्क साधला जात आहे.