सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात  एकूण ९७६ किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतिकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. शेवटच्या शिल्लक राहिलेल्या औसा रोड ते लातूर रोड या ५२ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतिकरण करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संपूर्ण रेल्वेमार्गाच्या विद्युतिकरणामुळे सोलापूर विभागाची ३११६  किलो लिटर डिझेलची म्हणजेच वार्षिक ३५ कोटी ४८ लाख रूपयांची बचत होणार आहे. ही बचत कुर्डूवाडी-लातूर विभागातील ८२६८ टन कार्बन फूटप्रिंटच्या बचतीशी बरोबर तुलना करणारी ठरली आहे. सोलापूर विभागात रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचा पहिला टप्पा आॕगस्ट २०१४ मध्ये मनमाड-पुणतांबा-शिर्डी (साईनगर) या ७३ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतिकरणाने पूर्ण झाला होता. त्यानंतर आठ वर्षात उर्वरीत संपूर्ण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : एसटीच्या ताफ्यात १५० विद्युत बस दाखल होणार, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ५० बस धावणार

भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी प्राधान्याने प्रयत्नशील आहे. २०३० सालापूर्वी   ‘ नेट झिरो कार्बन एमिटर ‘ बनण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे.

विद्युतिकरणाचे  फायदे

* पर्यावरण अनुकूल वाहतुकीचे साधन

 *आयात केलेल्या डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची बचत होते आणि कार्बन फूटप्रिंट कमी होतात.

 * रेल्वे परिचालनाचा खर्च कमी होतो. * कर्षण बदलामुळे होणारा अडथळा वा विलंब कमी करून विभागीय क्षमता वाढवते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 percent electrification of railway track in solapur division of central railway zws