महाराष्ट्रामधील करोनाबाधितांची संख्या पुढील दोन आठवड्यांमध्ये वेगाने वाढणार असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. चार एप्रिलपर्यंत राज्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णवाढ ही पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये असेल असं सांगण्यात येत आहे. पुण्यामध्ये ६१ हजार १२५, नागपूरमध्ये ४७ हजार ७०७ तर मुंबईत ३२ हजार ९२७ अॅक्टीव्ह रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. अनेक जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील असंही सांगितलं जात आहे. नागपूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवांची संख्या वाढवणं गरजेचं आहे असंही सांगण्यात आलं आहे. तसेच पुढील ११ दिवसांमध्ये मृतांची संख्या ६४ हजारांचा टप्पा ओलांडेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रुग्णांची संख्या पाहून त्या हिशोबाने वेगवेगळ्या ठिकाणी करोना बेड्सची संख्या निश्चित करण्यात यावी असं मत व्यास यांनी व्यक्त केलं आहे. करोनावर मात करुन ठणठणीत झालेल्या, ताप नसलेल्या आणि शरीरामधील ऑक्सिजनचं प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत असणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात यावं असं मत व्यास यांनी व्यक्त केलं आहे. तसेच दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची दर चार तासांनी सहा मिनिटांची चालण्याची चाचणी, ऑक्सिजनचं प्रमाण तपासून पाहणं यासारख्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत अस मतही व्यास यांनी व्यक्त केलं आहे.
ठाण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांसाठी तीन हजार अतिरिक्त बेड्सची सोय पुढील चार दिवसांमध्ये केली जाणार असल्याचे सांगितले आहे. नागपुरचे आयुक्त राधाकृष्ण बी यांनी खासगी रुग्णालयांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये अडीचशे बेड्स वाढवले जाणार असल्याची माहिती दिली. तसेच सरकारी आरोग्य महाविद्यालयामध्ये ९० तर सरकारी रुग्णालयामध्ये ४५ बेड्स वाढवण्यात येणार असल्याचं राधाकृष्ण बी यांनी म्हटलं आहे.