वाई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे विभागीय नाट्यसंमेलन महाबळेश्वर येथे २३ ते २५ फेब्रुवारी कालावधीत राज्यातील प्रसिद्ध नाट्य कलाकार रसिकांच्या उपस्थितीत होणार आहे. या नाट्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (दि २४) दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी नाट्य परिषदेचे विश्वस्त, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, मुख्य निमंत्रक आ. मकरंद पाटील यांच्यासह मान्यवर कलाकार,रसिक उपस्थितीत राहणार आहेत.

संमेलनाची माहिती देण्यासाठी महाबळेश्वर नाट्य परिषद शाखेच्यावतीने पत्रकार परिषदेत डी.एम.बावळेकर, महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक योगेश पाटील, नियामक मंडळ सदस्य राजेश कुंभारदरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, उपाध्यक्ष संतोष शिंदे, बबनराव ढेबे, संजय दस्तुरे, विलास काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आणखी वाचा-“एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपात यावं”, रक्षा खडसेंचं विधान चर्चेत, म्हणाल्या, “वरच्या पातळीवर…”

या नाट्यसंमेलनात सुरवातीला शुक्रवार (दि२३) स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन, दुपारी एकांकिका, नाट्य छटा व नाट्य संगीत स्थानिक कलाकलारांचा नाटक”गाढवाचं लग्न” सायंकाळी “नाना जरा थांबा ना” ही विनोदी एकांकिका सादर केली जाणार आहे. तर, आठ वाजता ”डोन्ट वरी हो जायेगा” हे दिग्गज कलाकारांचे व्यावसायिक नाटक सादर केले जाणार आहे.

शनिवार २४ फेब्रुवारी सकाळी शहरातून दहा वाजता भव्य नाट्य, दिंडी मध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध चित्ररथ, यामध्ये सिने व नाट्य कलाकारांची विशेष उपस्थिती असणार आहे.दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होईल.यानंतर अजितकुमार कोष्टी यांचा हसवणुकीचा कार्यक्रम होईल.सायंकाळी “कुर्रर्रर्रर्रर्रर्र” हे व्यावसायिक नाटक रात्री नाट्य व सिनेकलावंतांची संगीत रजनी हा कार्यक्रम होणार आहे. रविवार (दि २५) ला भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासक योगेश पाटील यांनी सांगितले.

आणखी वाचा-“हाताचा मटणाचा वास गेला असेल तर…”, उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित शिल्पा बोडखेंचा पक्षाला जय महाराष्ट्र!

सकाळी स्थानिक महिला व नाट्यकर्मी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांसाठी तीन बाल नाट्ये, दुपारी नाटक माझ्या चष्म्यातून या परिसंवादामध्ये खा. श्रीनिवास पाटील, डॉ. भावेश भाटिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. समीर शेख हे सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे संचालन प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते हृषीकेश जोशी करणार आहेत. चार वाजता संमेलनाचा हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यासाठी डॉ. जब्बार पटेल, नीलम शिर्के – सामंत व खा. श्रीनिवास पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी या वेळेत सिने व नाट्य कलावंत महाराष्ट्राची लोकधारा हा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी उशिरा संमेलनाचा समारोप अवधूत गुप्ते नाईट या कार्यक्रमाने होणार असून यामध्ये १५० कलाकार व तंत्रज्ञ यांचा सहभाग असणार आहेत.