अलिबाग-रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. इरशाळवाडी दरड दुर्घटनेनंतर प्रशासनाने २० दरड प्रवणं गावातील नागरीकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत या सर्व गावांमधील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार आहे.
खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दरड कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०७ जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेची गंभीर दखळ घेऊन अतिधोकादायक दरड प्रवण गावातील नागरीकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्याचा निर्णय़ प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा आपत्ती निवारण समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. यानंतर या २० गावांमधील नागरीकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
तळीये येथे २०२१ साली झालेल्या दरड दुर्घटनेनंतर जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडीयाच्या भुवैज्ञानिकांमार्फत रायगड जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील १०३ गावे दरड प्रवण क्षेत्रात असल्याची बाब समोर आली होती. यात २० गावांना दरडींचा अतिधोका असल्याचे नमूद करण्यात आले होते. ज्यात महाड ११, पोलादपूर २, रोहा २, म्हसळा २, खालापूर १, कर्जत १, श्रीवर्धन १ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या सर्व गावातील नागरीकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
या शिवाय ८३ दरड प्रवण गावांमधील सद्यस्थिती तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गरज वाटल्यास या गावांमधील नागरीकांनाही जवळपासच्या सुरक्षित ठिकाणी अथवा त्यांच्या नातेवाईकांकडे हलविण्यात येणार आहे. प्रत्येक गावांसाठी एक नोडल ऑफीसरची नियुक्ती करण्याचे निर्देशही या बैठकीनंतर तालुका प्रशासनाला देण्यात आले आहे.
अतिधोकादायक आणि धोकादायक दरडी प्रवण गावे…
वावा, आमशेत, लोअर तुडील, टोळ खुर्द, शिंगारकोड मोरेवाडी, आंबिवली बुदृक पटेरेवाडी, सुभाष नगर, मुद्रे बुदृक, कोंडीवते, बागमांडले, कोंडवी मराठवाडी, कोतवाल खर्द, मुठावली, तिसे, सोनघर, चांढवे खुर्द, वालुंजवाडी, सव, रोहण, कोथेरी जंगमवाडी.
जिल्ह्यातील १०३ दरड प्रवण गावांची सद्यस्थिती तपासून नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सांगितले आहे. २० अतिधोकादायक गावांतील नागरीकांनी आजच सुरक्षितस्थळी नेत आहोत.- योगेश म्हसे, जिल्हाधिकारी रायगड.