काही दिवसांपूर्वी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ४८ तासांत सुमारे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये काही नवजात बालकांचाही समावेश होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं. विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर विविध आरोप केले. रुग्णालयात औषधांची कमतरता असल्याने संबंधित मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. पण रुग्णालयात औषधांची कमतरता नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. असं असलं तरी गेल्या आठ दिवसांत याच रुग्णालयात एकूण १०८ जणांचा मृत्यू झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या आठ दिवसात सुमारे १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत एका अर्भकासह ११ रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृत्यूबद्दल भाष्य करताना रुग्णालयाचे डीन श्याम वाकोडे यांनी, रुग्णालयात औषधांचा तुटवडा नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.

One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
Loksatta explained What is the exact reason behind the death of ten elephants in Bandhavgarh National Park in Madhya Pradesh
विश्लेषण: एकाच वेळी दहा हत्तींच्या मृत्यूमागे नेमके कारण काय?
sucide pod controversy
सुसाईड पॉडमध्ये महिलेचा रहस्यमयी मृत्यू? मृत्यूचे कारण आत्महत्या की हत्या? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?
NMC, safety doctors, medical colleges, doctors,
धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पोटातून डॉक्टरांनी काढल्या तब्बल ६५ वस्तू; शस्त्रक्रियेदरम्यान झाला मृत्यू, पोटात आढळलं…

‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत रुग्णालयाचे डीन श्याम वाकोडे म्हणाले, “गेल्या २४ तासांत आम्ही ११०० हून अधिक रुग्णांची तपासणी केली. यातील १९१ नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं. यापूर्वी २४ तासांत सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत होता. ही संख्या आता ११ वर आली आहे. संबंधित मृतांमध्ये जन्मत: विकार असलेल्या बालकांचा समावेश आहे.”

हेही वाचा- नांदेड रुग्णालय मृत्युसत्रानंतर प्रशासन सतर्क, यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह स्त्री रुग्णालयात…

“आम्ही पुरेशी औषधे साठवून ठेवली आहेत. तसेच वैद्यकीय कर्मचारी सर्व रुग्णांना मदत करत आहेत. औषधांच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला,” असंही रुग्णालयाचे डीन म्हणाले. दरम्यान, मंगळवारी काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ६० हून अधिक अर्भकांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु बाळांची काळजी घेण्यासाठी फक्त तीन परिचारिका कार्यरत होत्या.