ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे य़ांनी टीका केली आहे. अनिल देशमुख यांच्या घरी १०९ वेळा छापे टाकण्यात आले. १०८ वेळा ईडीला काही मिळाले नाही का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच एकाच व्यक्तीच्या घरी इतक्या वेळा छापे टाकण्याचा हा विश्वविक्रम होऊ शकतो, याची लिम्का बूकमध्ये नोंद होऊ शकते, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशमुख आणि मलिकांचा अर्ज

राज्यसभेच्या निवडणुकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना मतदानाची संधी मिळावी यासाठी मंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ प्रयत्न करीत असल्याचेही सुळे म्हणाल्या, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी नुकतेच राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी ईडीकडे अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर ८ जूनला सुनावणी होणार आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा

आमचे दोन नेते काहीही चुकीच न करता तुरुंगात आहेत. हा आमच्यावर आणि आमच्या दोन्ही नेत्यांवर अन्याय आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. आम्हाला आज ना उद्या न्याय ज्या पद्धतीने केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे तसे आजवर कधीही झालेले नसल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.