शिक्षणासाठी खासगी निवासी वसतिगृहात राहणाऱ्या दहावीच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून एका अल्पवयीन मुलाने मित्राचीच हत्या केली. दत्ता हजारे (वय १५) असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी हत्या करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात अमृतेश्वरनगरमध्ये राजमाता गुरुकुल या खासगी वसतिगृहात गरीब कुटुंबातील अनेक मुलं शिक्षणासाठी राहतात. परळी तालुक्यातील पौळिपप्री येथील दत्ता हजारे व त्याचा मित्र हे दोघेही एकाच खोलीत राहत होते.

मंगळवारी सकाळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले. दुपारी शाळेतून परतल्यानंतर दत्ता हजारे वसतिगृहाच्या गच्चीवर अभ्यास करत बसला होता. दत्ताला पाहिल्यानंतर त्या मित्राने सकाळच्या भांडणाचा राग मनात धरुन जाड वस्तू दत्ताच्या डोक्यात मारली. यात दत्ताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर मित्राने तिथून पळ काढला. इतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर वसतिगृह चालकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

जखमी दत्ताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रात्रीपासून पोलिसांनी फरार मुलाचा शोध घेतल्यानंतर बुधवारी सकाळी दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी आरोपी मुकुंदराज विद्यालय परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी परीक्षा केंद्राबाहेरुन त्याला ताब्यात घेतले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10th standard student murdered in ambajogai minor detained