जळगाव जिल्ह्यात भाजपाला शिवसेनेकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील भाजपाच्या ११ नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नगरसेवकांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला.