पारनेर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेनेने सर्व १७, राष्ट्र्रवादीने ९, काँग्रेसने ८ जागा व भाजपने १३ जागांवर पक्षाचे आणि ४ जागांवर उमेदवार पुरस्कृत केले आहेत. आमदार विजय औटी यांचे चिरंजीव अनिकेत औटी यांचा या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय प्रवेश झाला असून, त्यांनी प्रभाग क्रमांक आठमधून शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रभागनिहाय अर्ज दाखल करण्यात आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग १- वैशाली औटी (शिवसेना), मनीषा बोरुडे (राष्ट्रवादी), शीतल म्हस्के (भाजप). प्रभाग २- दत्तात्रेय कुलट (शिवसेना), शिवाजी मते (राष्ट्रवादी), संदीप चौधरी (भाजप). प्रभाग ३- नंदा देशमाने (शिवसेना), गीतांजली गायकवाड (काँग्रेस), सुनीता गाडगे (भाजप). प्रभाग ४- शोभा म्हस्के (शिवसेना), विजेता सोबले (राष्ट्रवादी), पूनम शेरकर (भाजप पुरस्कृत). प्रभाग ५- सीमा औटी (शिवसेना), सुनीता औटी (राष्ट्रवादी), शोभा आमले (भाजप पुरस्कृत). प्रभाग ६- चंद्रकात चेडे (शिवसेना), बापू पुजारी (काँग्रेस), राम चेडे (भाजप पुरस्कृत). प्रभाग ७- मनीषा औटी (शिवसेना), मालन शिंदे (काँग्रेस), स्वाती पठारे (भाजप). प्रभाग ८- अनिकेत विजयराव औटी (शिवसेना), शैलेंद्र औटी (काँग्रेस), संतोष शेटे (भाजप). प्रभाग ९- पुष्पा साळवे (शिवसेना), कुसुम गायकवाड (काँग्रेस), छाया गायकवाड (भाजप). प्रभाग १०- स्वाती गाडगे (शिवसेना), प्रतिभा मते (राष्ट्रवादी), सुरेखा भालेकर (भाजप पुरस्कृत). प्रभाग ११- नंदकुमार देशमुख (शिवसेना), फिरोज हसन राजे (काँग्रेस), राजकुमार गांधी (भाजप). प्रभाग १२- उमा बोरुडे (शिवसेना), मीरा इंगळे (काँग्रेस), शशिकला शेरकर (भाजप पुरस्कृत). प्रभाग १३- विशाल शिंदे (शिवसेना), श्रीकांत औटी (राष्ट्रवादी), अनिल औटी (भाजप). प्रभाग १४- विठ्ठल औटी (शिवसेना), रावसाहेब औटी (राष्ट्रवादी), दिलीपकुमार देशमुख (भाजप). प्रभाग १५- मुदस्सर रफीक सय्यद (शिवसेना), अजिम अमिन शेख (काँग्रेस), राहुल बुगे. प्रभाग १६- रामा औटी (शिवसेना), संदीप कावरे (राष्ट्रवादी), सचिन औटी (भाजप). आणि प्रभाग १७- रतन औटी (शिवसेना), संगीता औटी (राष्ट्रवादी), प्रतिभा औटी (भाजप).
अकोल्यात काँग्रेस आघाडी विरुद्ध युती
अकोले नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी १७ जागांसाठी १४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि भाजप-सेना युती यांच्यात सरळ लढत होत आहे. मोठय़ा संख्येने अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असल्याने दोन्हीही आघाडय़ांना बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
गुरुवारी शेवटच्या दिवशी तब्बल १२३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती झाली असून राष्ट्रवादी १३ तर काँग्रेस ४ जागा लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष वकील के. डी. धुमाळ यांनी उमेदवारी दाखल केली आहे. भाजप-शिवसेना युतीतर्फे शिवसेना ९ आणि भाजप ८ जागा लढवत आहे. युतीच्या उमेदवारांमध्ये माजी जि.प. सदस्य अनिता मोरे तसेच अकोल्यातील प्रथितयश डॉ. विजय पोपेरे यांचा समावेश आहे. तब्बल १०३ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून, त्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कुलकर्णी यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी/काँग्रेस आघाडीचे उमेदवार- उत्तम मंडलिक, कल्पना चौधरी, शुभदा नाईकवाडी, स्वाती सारडा, कल्पना सूरपुरिया, प्रकाश नाईकवाडी, शबाना शेख, उज्ज्वला गायकवाड, बाळासाहेब वडजे, संगीता शेटे, के. डी. धुमाळ, सुरेश लोखंडे, कीर्ती गायकवाड, नामदेव पिचड, निशिगंधा नाईकवाडी, स्वाती शेणकर, परशुराम शेळके.
भाजप/शिवसेना युतीचे उमेदवार- प्रमोद मंडलिक, वनिता चौधरी, प्रतिभा मनकर, मंजूषा संत, सोनाली नाईकवाडी, गणेश कानवडे, अपर्णा बाळसराफ, रचना बाळसराफ, रोहिदास धुमाळ, अनिता मोरे, बबलू धुमाळ, महम्मद कुरेशी, निखिल जगताप, डॉ. विजय पोपेरे, नूतन नाईकवाडी, अश्विनी नितीन नाईकवाडी व नितीन नाईकवाडी.
कर्जतमध्ये सगळेच स्वबळावर
नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक नाटय़मय घडामोडींनंतर भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या सर्व पक्षांनी स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. १७ जागांसाठी १५६ अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेसने प्रभाग १६ मध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख दीपक शहाणे यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही. भाजप-शिवसेना युतीमध्ये बैठका झाल्या, मात्र जागावाटपाचा तिढा न सुटल्याने अखेर युती फिस्कटली.
गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये नामदेव राऊत, प्रसाद ढोकरीकर, ललिता तोरडमल, सोमनाथ कुलथे, सचिन घुले, दादा सोनमाळी, कल्याणी नेवसे, मंदाकिनी सोनामाळी, स्मिता भोज, रमेश लांगोरे, शिवाजी बेलेकर, स्वाती बोरा या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झालेली होती. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत साडेपाच वाजेपर्यंत होती. या वेळी सर्व उमेदवार आतमध्ये घेऊन नंतर दरवाजा बंद करण्यात आला. तरीही शेवटचा अर्ज घेण्यासाठी साडेसात वाजले होते. उमेदवाराना एबी प्रमाणपत्र देण्यासाठी भाजप वगळता सर्वच पक्षांना कसरत करावी लागली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा