वर्धा : रेल मंत्रालयाने देशभरातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला असून त्यात राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. नागपूर रेल मंडळातील १५ स्थानके या योजनेत आली आहे.अमृत भारत म्हणून ही योजना देशात सुरू होत असून त्याचा कामाचा शुभारंभ ६ ऑगस्टला होत आहे.खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.त्यास सविस्तर उत्तर देताना रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांनी योजनेची माहिती दिली.या अमृत योजनेत निवडण्यात आलेल्या स्थानकावर विविध सुविधा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रतीक्षाकक्ष , शौचालये, स्थानिक उत्पादन विक्री सुविधा, मोफत वाय फाय, एक स्टेशन एक उत्पादन, परिसर सुशोभीकरण,वाहतूक सुधारणा आदी कामे होणार आहेत.तुलनेने लहान असलेली स्थानके विकसित केल्या जात आहेत.वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट स्थानकास २३ कोटी रु, सेवाग्राम १९ , पुलगाव १७ तर धामणगाव स्थानकासाठी १९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.