कराड : कराडच्या बहुचर्चित शिवशंकर नागरी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराची पोलखोल होवू लागली आहे. पतसंस्थेत तब्बल १३  कोटी ९  लाख ९६ हजारांचा अपहार झाल्याचे नमूद करीत पोलिसांनी याचा सखोल तपास केला जात असल्याचे म्हटले आहे.ठेव नसताना ठेव तारण कर्जाचे वाटपासहीत विनातारण कर्ज वितरण, कागदपत्रांचीही पूर्तता न करताच कर्ज वितरणासारखे आणि खोट्या स्वाक्षऱ्या, बनावट कागदपत्रांच्या आधारावर हा अपहार करण्यात आला असून

या अपहाराचा अहवाल विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी दिला आहे. त्यानुसार या सर्व प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असल्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक के. एन. पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना आहे.शिवशंकर पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अनेकदा कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत भ्रष्टाचारी संचालक मंडळ व प्रशासनाविरुध्द गुन्हे दाखल करुन न्याय देण्याची मागणी केली.  त्याबाबतची निवेदनही पोलिसांना दिली.

minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप

हेही वाचा >>>“४० पैसेवाल्यांनी राहुल गांधींचा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने सादर केला”, नाना पटोलेंकडून ‘तो’ संपूर्ण VIDEO शेअर

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कराडच्या मुख्य बाजापेठेतील शिवशंकर पतसंस्थेत १ एप्रील २०२१ ते ३१ मार्च २०२३ अखेरचे वैधानिक लेखा परीक्षण झाले असून, ते विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी केले आहे. त्याचा त्यांनी अहवालही दिला आहे.विशेष लेखा परीक्षकांच्या अहवालानुसार शिवशंकर पतसंस्थेत  १३ कोटी ९ लाख ९६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका विशेष लेखा परीक्षकांनी ठेवला आहे. या आधारे संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे त्यांनी सुचवले होते.कराडचे सहकारी संस्था उपनिबंधक जनार्दन शिंदे यांनीही विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी सादर केलेल्या अहवालत पतसंस्था संचालक मंडळ आणि प्रशासनावर वरीलप्रमाणे अपहार झाल्याचा ठपका ठेवला असल्याचे सांगितले. या आर्थिक नुकसानीस जबाबादर असणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्याचेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगेंचं खुलं आव्हान, “..तर ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही”

कर्ज वितरण करताना तारण न घेणे, अपूर्ण कागदपत्रे, त्यासह व्यवस्थापक व सेवकांच्या मदतीने तयार केलेल्या खोटी व बनावट कागदपत्रे वापरली गेल्याचे गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या हितास बाधा निर्माण झाली आहे. विश्वासघात, फसवणूक करून संचालक मंडळाने हेतु पुरस्सर नियमबाह्य व पदाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने मोठा अपहार केल्याचा ठपका  ठेवला गेला आहे. त्यासह ठेव नसताना ठेव तारणाच्या नावाखाली तब्बल एक कोटी ५६ लाख ७९ हजारांचे कर्जही वितरण केल्याचे त्यांच्या अहवालात नमूद आहे. पोलिसांना तो अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार पतसंस्थेतील एकूणच गैव्यवहारप्रकरणी पोलिस चौकशी सुरू झाली आहे.वरिष्ठ पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी ही एकूणच चौकशी बारकाईने सुरू असून लवकरच त्याबाबतची कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.