परतीच्या पावसाने गेले काही दिवस नगर शहर व परिसरात दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोरडय़ा पडलेल्या या धरणातील पाणीसाठा आता १३ टक्के झाला आहे.
नगर व तालुका आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावासाने सीना धरणामध्ये पाणी आले आहे. २ हजार ४०० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात गुरुवारी ३९० दशलक्ष घनफूट पाणी आले आहे. कुकडीचे आवर्तन सुटले, मात्र धरणात पाणी पोहोचतानाच बंद झाले. त्यामुळे धरणात पाणी नव्हते. कोठेच पाऊस नसल्याने धरण कोरडे ठाक पडले होते. धरणातू भरले जाणारे पिण्याच्या पाण्याचे टँकरदेखील त्यामुळे बंद झाले होते.
मात्र गेल्या दहा दिवसांत नगर शहर व धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस पडला. या जोरदार पावसाने धरणामध्ये पाणी आले आहे. धरणाच्या अलीकडे बरेच बंधारे झाले असून त्यामुळे पाणी येण्यास विलंब झाला, मात्र हे बंधारे भरून धरणात नवे पाणी आले आहे. हा पाणीसाठा वाढल्याने मिरजगाव परिसरातील शेतकरी आनंदी झाले आहेत.
सीना धरणात १३ टक्क्य़ांवर पाणीसाठा
परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
Written by अपर्णा देगावकर
आणखी वाचा
First published on: 18-09-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 percent water stock in seena dam