जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज साताऱ्यात साडेतेरा हजार सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत विविध शासकिय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत तातडीने जुनी पेन्शन याोजना लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. या संपात १३ हजार ५६५ सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
साताऱ्यात जुनी पेन्शन योजनेसाठी ४६ वर्षांनी राज्य सरकार आणि कर्मचारी आमने-सामने आले आहेत तर आजपासून राज्यभरात १८ लाख कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सरकार आक्रमक झाले आहे आणि जे कर्मचारी या संपामध्ये भाग घेतील त्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे सरकारने ठणकावून सांगितले आहे. त्याचबरोबर काम नाहीतर वेतन नाही असे सांगत शासकीय निंम शासकीय कर्मचाऱ्यांना इशाराही दिला आहे.आरोग्य विभाग, शिक्षण विभाग ,ग्रामसेवक ,नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
यांसारखे महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे आंदोलनाला एक वेगळे वळण आले का आहे.
या संपाचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. साताऱ्यात आज जुनी पेन्शन योजनेसाठी मोठया संख्येबे सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात समाधानकारक तोडगा न निघाल्याने आजपासून सरकारी कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्या बरोबर साताऱ्यातही सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला. या संपात सातारा जिल्ह्यातील विविध विभागातील सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी एकत्रित आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवा, शासकीय सेवेत कर्मचाऱ्यांना समाविष्ट करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, आदी घोषणा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या. जे कर्मचारी या संपामध्ये भाग घेतील त्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सरकारने सांगितले आहे. त्याचबरोबर काम नाहीतर वेतन नाही, असे सांगत शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना इशाराही दिला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साताऱ्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन केले.