जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना तब्बल १३७ कोटी, १४ लाख, ८१ हजार ८८३ रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यासंदर्भात मुक्ताईनगर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुरूम उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी, खडसे कुटुंबीयांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीची खरेदी करण्यात आली असून, तेथून राष्ट्रीय महामार्गासाठी  ४०० कोटींच्या गौण खनिजाचे उत्खनन करीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याअनुषंगाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी चौकशीची ग्वाही दिल्यानंतर राज्य शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन केले. या पथकाने चौकशी करीत अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
friend beaten , loan , Pune, Bhosari, pune news,
पुणे : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राला लाकडी दांडक्याने मारहाण
kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
Conditional possession to eligible tenants on comprehensive list decision of MHADA Vice Chairman
बृहतसूचीवरील पात्र भाडेकरुंना सशर्त ताबा, म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड

हेही वाचा >>>एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच वेतन मिळणार; १२,५०० रुपये सण अग्रीम रक्कम

पथकाच्या अहवालानंतर मुक्ताईनगर येथील तहसीलदारांनी खडसे कुटुंबीयांना नोटीस बजावली. नोटिशीत सातोड शिवारातील खुल्या भूखंडातून अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन व वाहतूक केल्याचे नमूद करीत अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी एक लाख, १२ हजार ११७ रुपये इतके दाखविण्यात आले असून, नियमानुसार त्याच्या पाचपट दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ही जमीन आहे. आमदार खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचाही त्यात समावेश आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारात शेतजमिनी आमच्या नावावर असल्या, तरी अवैधरीत्या गौण खनिजाच्या उत्खननाशी आमचा दुरान्वये संबंध नाही. १३७ कोटी रुपये दंडासंदर्भात नोटिशीवर अपील करता येते.  माझे विरोधक आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्या हाती काहीही लागत नाही. मी महसूलमंत्री असताना त्यावेळची प्रकरणे ते काढत आहेत.  हा सर्व प्रकार राजकीय षडय़ंत्राचा खेळ आहे. वेळ आल्यानंतर योग्य उत्तर देणार आहे. – एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट

Story img Loader