कराड : समाजमाध्यमावर देव – देवता, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत उसळलेल्या दंगलप्रकरणी आणखी १५ जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १६ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पुसेसावळी आणि सातारा शहरासह जिल्ह्यात शांतता असली तर अद्याप तणावाचे वातावरण आहे. पोलिसांचा बंदोबस्त सर्वत्र मोठा बंदोबस्त असून, जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ‘इंटरनेट सेवा’ बंद असल्याने त्याचा फटका उद्योग, व्यापार आणि बँकिंग क्षेत्राला बसून कोटय़वधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

 पुसेसावळीत रविवारी रात्री झालेल्या दंगलीमध्ये एकजण ठार तर, दहाजण जखमी झाले होते. यातील जखमींची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३४ जणांना अटक केली आहे. यातील १९ जणांना मंगळवारी तर अन्य १५ जणांना बुधवारी अटक करत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईने पुसेसावळी परिसरातील तरुण मोठय़ा प्रमाणात गाव सोडून निघून गेले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळेही दोन्ही समाजाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्या वादग्रस्त मजकूर प्रसारित करणाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे. या अटकसत्रामुळे जिल्ह्यातील तणावात काहीशी वाढ झाली आहे.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा >>> Maratha reservation: जरांगेंचे उपोषण सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची प्रतीक्षा

रम्यान, या घटनेनंतर सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील वातावरण तणावाचे आहे. अत्यावश्यक सेवा सोडल्यास अन्य दैनंदिन व्यवहार, बाजारपेठा, दुकाने बंद आहेत. अनेक शाळा, महाविद्यालये देखील बंद आहेत. जी सुरू आहेत, तिथली उपस्थिती रोडावलेली आहे. अनेक रस्त्यांची नाकाबंदी केलेली आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील ‘इंटरनेट सेवा’ बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका उद्योग, व्यापार आणि बँकिंग क्षेत्राला बसला असून, कोटय़वधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. दरम्यान, दंगलीतील मृत तरुण नूरहसन शिकलगार याच्या नातेवाईकांनी या घटनेसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अटकेची मागणी केली होती.

हेही वाचा >>> जातनिहाय जनगणना आवश्यकच!; छगन भुजबळ यांचे ठाम मत; ‘मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्राच्या हाती’

यावर आज हिंदूत्ववादी संघटनांच्या प्रमुखांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत या दंगलीशी विक्रम पावसकर यांचा काडीमात्र संबंध नसल्याचा दावा केला. विशिष्ठ समूहातील ठरावीक लोकांकडून हिंदूंच्या धार्मिक भावना कशा दुखावल्या जातात. तसेच या दंगलीस जबाबदार अल्ताफ शिकलगार, साबीर मुल्ला ( दोघेही रा. कराड) सादिक शेख, रमजान कागदी, जमीर शेख ( तिघेही रा. सातारा) तसेच बागवाने ( रा. पुसेसावळी) यांच्या अटकेची मागणी केली आहे. समाजमाध्यमावर ‘आलमगीर औरंगजेब’ नावाने गट तयार करणाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. हिंदू एकता आंदोलनाचे प्रांताध्यक्ष विनायक पावसकर, चंद्रकांत जिरंगे, शिवसेना तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, शिवप्रतिष्ठानचे सागर आमले आदी या वेळी उपस्थित होते.