सांगलीजवळील जतमध्ये एका ऊस तोडणी मजुरांना घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे. ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने गाडी पलटी होऊन पंधरा ऊसतोड मजूर हे जखमी झाले. जखमीमध्ये काही मुलांचे देखील समावेश असून जखमींना मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- जांबमधील मूर्तीचोरी प्रकरणी दोघांना अटक

अपघातग्रस्त ऊसतोड मजूर बीड आणि जालना जिल्ह्यातील असून जत मार्गे ते कर्नाटक मधल्या बेळगी साखर कारखान्याकडे निघाले होते. जतमधून काही अंतरावर गाडी पोहोचली असता, चालकाने अचानक वाहनाचा ब्रेक दाबला. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. त्यामध्ये गाडीमध्ये बसलेले १५ ऊसतोड मजूर जखमी झाले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र अपघातामध्ये ट्रकचे आणि ऊसतोड मजुरांच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.