पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयातील १६० विद्यार्थ्यांना कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून यातील पाच विद्यार्थ्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
लोणी काळभोर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील एमआयटी महाविदयालयातील मॅनेजमेंट विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अल्पोपहार केला. काही वेळानंतर त्यातील काही विद्यार्थ्याना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या विद्यार्थ्यांनी अल्पोहारावेळी गुलाबजाम खाल्याने अधिक त्रास झाल्याचे काहींनी सांगितले. या विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या १६० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून यातील पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी