सांगली : सांगलीतील पथकर नाक्याजवळ एसटी बस रस्त्याकडेच्या शेडवर आदळल्याने झालेल्या अपघातात १६ प्रवासी जखमी झाले. सोमवारी दुपारी अपघात झालेली बस कराड तालुक्यातील नाईकबा तीर्थस्थानाहून सांगलीकडे येत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सांगली आगाराची बस (एमएच ४० एन ९५०३) नाईकबाहून परत येत होती. बस सांगलीवाडी नजीक टोलनाक्यावर आल्यानंतर बैलगाडी सांगलीकडे येत होती. बैलगाडीच्या पुढे जाण्यासाठी बस चालकांने डावीकडील बाजूने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीच्या चिखलात बसची चाके घसरून रस्त्याकडेला पथकर आकारणीसाठी उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवजा कार्यालयात ती घुसली.

हेही वाचा – “काँग्रेस फुटणार अशीही चर्चा आहे, आम्ही कुणावर…”, अबू आझमींचं सूचक वक्तव्य

हेही वाचा – “राज्यात तरुणांच्या हाताला काम नाही, तरीही गोव्याच्या धर्तीवर…”, नाना पटोलेंची सरकारवर टीका

या अपघातामध्ये एसटीच्या चालक व महिला वाहकासह १६ प्रवासी जखमी झाल्याची माहिती एसटी आगाराकडून देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस अपघात स्थळी दाखल झाले. तत्पुर्वी स्थानिक नागरिक यांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.