जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांची संख्या ६० वर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : तीन दिवसांपासून यवतमाळच्या करोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनासह नगारिकही चिंताग्रस्त झाले आहेत. आज रविवारी तब्बल १६ नवीन करोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे विलगीकरण कक्षात उपचार सुरू असलेल्या ‘अ‍ॅक्टिव्ह’ करोनाबाधितांची संख्या ५० वर पोहचली. जिल्ह्यात आतापर्यंत करोना संसर्गाची लागण झालेल्या ६० रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितित २६४ संशयितांचे चाचणी अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

रविवारी दिवसभरात विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या १६ रुग्णांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले. सद्यस्थितित २६४ संशयितांचे चाचणी अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

सध्या विलगीकरण कक्षात ५० करोनाबाधितांसह २९८ संशयित भरती आहेत. रविवारी ३९ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात १६६ तर गृहविलगीकरणात ८२९ जण असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले. यापूर्वी करोना संसर्गाची लागण होऊन उपचार झालेल्या १० रुग्णांना सुट्टी झाली आहे.

त्यामुळे बाधितांचा आकडा ६० वर पोहचला आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास पुढे काय होईल, या भयाने नागरिकांना ग्रासले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील नगरसेवकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

शहरातील प्रतिबंधित केलेल्या प्रभाग १० आणि २० मधील नगरसेवकांसोबत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आज रविवारी बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. या भागातूनच सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळावे, नमाजकरिता पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी मशिदीत जमू नये, प्रकृती ठीक नसल्यास तत्काळ आरोग्य विभागास कळवावे, यासाठी नगरसेवक जावेद परवेज अन्सारी व प्रा. प्रवीण प्रजापती यांनी फोनवरून नागरिकांना आवाहन करण्याचे सुचविले. रमजानचा पवित्र महिना असल्यामुळे या भागात दूध, फळ व भाजीपाला हे शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करावे. पवारपुरा ते इंदिरा नगर येथील नागरिकांच्या १०० टक्के करोना चाचणी करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. दोन्ही नगरसेवकांनी त्यांच्या वतीने या भागातील ५५० घरांना धान्याच्या किट आलटून, पालटून देण्याचे ठरवले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 new covid 19 positive patients in yavatmal zws