सातारा – महाबळेश्वर येथे १६०.६० मिमी, तर जिल्ह्यात आज सरासरी २१.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी ७५७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणांमध्ये एकूण १२७.९७ अब्ज घन फूट (टीएमसी) पाणीसाठा असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी दिली.

हेही वाचा >>> CM Eknath Shinde : “लाडक्या बहिणी कपटी आणि सावत्र भावाला धडा शिकवतील”, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

municipal administration launched Kacharamukt Tas campaign
कचरामुक्त तास मोहिमेतून ६४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन, १ हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
shivaji nagar mumbai pollution
मुंबई : शिवाजी नगरमधील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Mumbai dust latest news in marathi
दोन महिन्यांमध्ये मुंबईतील पीएम २.५ धूलीकणांमध्ये वाढ

साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरात संततधार सुरू आहे. यामुळे नद्या, ओढे, नाले भरभरून वाहत आहेत. विहिरींच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. सातारा शहरात व तालुक्यात, कास पठारावर जोरदार पाऊस सुरू आहे. साताऱ्यातील ऐतिहासिक तळी काठोकाठ भरली आहेत. सततच्या पावसाने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे धोम धरणातून ७६२१ क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले आहे.कालव्याद्वारे २०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. वाई शहरात गणपती घाटावर पाणी आल्याने महागणपती पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. यामुळे किसन वीर चौकात अनेकदा वाहतूककोंडी होत आहे.

हेही वाचा >>> जयकुमार गोरे यांच्याविरोधातील याचिकाकर्त्यांच्या घरावर छापा

महाबळेश्वर येथे १४०.६० मिमी एकूण ४३३१.७० मिमी (१७०.५३९ इंच) पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण १२७.९७ टीएमसी पाणीसाठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून, सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे. मोठे प्रकल्प – कोयना ८६.७२ (८२.३९), धोम ११.५२ (८५.१६), धोम – बलकवडी ३.४४ (८४.३१), कण्हेर ८.०१ (७९.३१), उरमोडी ८.१२ (८१.५३), तारळी ५.०४ (८६.१५) या प्रमाणे पाणीसाठा आहे.

Story img Loader