सातारा : आरोग्य विभागामार्फत सातारा जिल्ह्यात दि. २३ डिसेंबर ते ३ जानेवारीअखेर क्षयरुग्ण शोधमोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण लोकसंख्येच्या १९ टक्के म्हणजेच तीन लाख २० हजार ६४३ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी १६० पथके तयार केली असून, शहरी व ग्रामीण भागातील ६४ हजार १२९ घरांना भेट दिली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिल्ह्यात क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी क्षयरुग्ण शोधमोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील ६४ हजार १२९ घरी तीन लाख २० हजार ६४३ लोकसंख्येचे सर्वेक्षण आशासेविकांमार्फत करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी १६० पथके तयार केली आहेत. यामध्ये पर्यवेक्षक व ४२२ कर्मचारी असणार आहेत. १० टक्के लोकसंख्येमधून १६ हजार ३२ संशयित रुग्ण शोधण्यात येणार आहेत. त्यांपैकी ३२१ क्षयरुग्ण शोधण्यात येणार आहेत. या सर्व रुग्णांवर औषधोपचार, त्यांची तपासणी करण्यात येणार असून, डीबीटीद्वारे दरमहा एक हजार रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. तसेच दर महिन्याला फूड बास्केटही दिली जाणार आहे.

हेही वाचा – सातारा : सीमाशुल्क अधिकारी असल्याचे भासवून महिला डॉक्टरला गंडा

u

s

सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशासेविका यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सर्व क्षयरोग संशयितांची थुंकी नमुना तपासणी, आवश्यक असल्यास क्ष-किरण तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

हेही वाचा – Dhananjay Munde : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले,”मी…”

क्षयरुग्ण शोधमोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. सन २०२५ पर्यंत केंद्र शासनाने क्षयमुक्त भारत करण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण राबवण्यात येत आहे. या दोन्ही मोहिमा यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. – याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., सातारा</p>