लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : संततधार सुरु असलेला पाऊस आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे सांगलीतील आरवाडे पार्क या नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने १७ जणांचे संजयनगर येथील निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले. कृष्णेची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २९ फूट ४ इंचावर पोहचली असून इशारा पातळी ४० तर धोका पातळी ४५ फूट आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

आणखी वाचा-सांगली : चांदोली धरणाजवळ सौम्य भूकंपाचा धक्का

चांदोली धरणातून वारणा नदीत आणखी विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे. बुधवारी सकाळी ११.३० वाजता ८८७४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या ३८०० क्यूसेक विसर्ग सुरू असून त्यात वाढ करुन वक्र द्वार द्वारे ७२१६ क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६५८ क्यूसेक असे ८८७४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला. पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून ९.३० वाजल्यापासून प्रति सेकंद २ लाख क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे.