करोनासदृश लक्षणे; प्रशासनावरील ताण वाढला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार :  पालघर जिल्ह्य़ात करोनापाठोपाठ आता सारी रोगाचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्य़ात सारीचे १७५ रुग्ण आढळले आहेत.

करोना आणि सारीच्या आजारात रुग्णांची लक्षणे सारखीच असून सारीच्या रुग्णांना करोनाचा सर्वाधिक धोका संभवत असल्याने या रुग्णांवरही आता प्रशासनाला लक्ष ठेवावे लागत आहे.

सारी म्हणजे तीव्र श्वसनाचे विकार असलेले रुग्ण. यात दमा, डांग्या खोकला आणि इतर श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांचा समावेश होतो. सारी आणि करोना यांची लक्षणे जवळजवळ सारखीच असल्याने तसेच सारीच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती तुलनेने कमी असते.  या रुग्णांना करोनाचा धोका अधिक असल्याने प्रशासन या रुग्णांवरही लक्ष ठेवून आहे.

जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २१ एप्रिल सकाळी १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार संपूर्ण जिल्ह्य़ात १७५ रुग्ण हे सारीच्या विकाराने ग्रस्त असल्याची नोंद आहे.

यातील तालुकानिहाय माहिती अशी की, डहाणू ११, पालघर ८२, जव्हार १९, मोखाडा ४, वसई ग्रामीण ४, तलासरी ३, विक्रमगड १, वाडा ५, वसई—विरार मनपा क्षेत्र ४६  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्णांवर प्रशासनाचे लक्ष 

नुकत्याच औरंगाबाद शहरात सारीमुळे १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यातील सारी रुग्णांचा आकडा धोक्याची घंटा समजली जात आहे.वसई—विरार परिसरात पालघर पाठोपाठ सारीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याबाबत माहिती देताना वसई-विरार महापालिका आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले की, हे सर्व रुग्ण निरीक्षणाखाली असून नियमित यांची तपासणी केली जात आहे. जर कुणाला करोनाची लक्षण आढळल्यास त्यांना तातडीने उपचारासाठी आणले जाते.