सातारा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सहा उमेदवारांनी माघार घेतली. शुक्रवारी एका उमेदवाराने माघार घेतल्याने आता िरगणात १८ उमेदवार राहिले आहेत. महायुतीचे बहुचíचत उमेदवार संभाजी संकपाळ यांनीही अर्ज मागे घेतला असून आरपीआयमधील सातारा जिल्ह्यातील नेते जातीयवादी आहेत. त्यांनी मराठा समाजाचा अपमान करून पशाच्या अवास्तव मागण्या माझ्याकडे केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी फुलले होते. किती अर्ज माघारी निघतील याचा अंदाज बांधले जात होते. शालिनी िनबाळकर तसेच डमी म्हणून भरलेले डॉ. दिलीप येळगावकर, बाबुराव माने, प्रकाश कांबळे यांचा अर्ज माघारी घेतल्यावर वेग मंदावला. त्यानंतर बाबासाहेब बनसोडे आणि मुदत संपण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर महायुतीचे म्हणून जाहीर केलेले संभाजी संकपाळ यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. गुरुवारी मििलद रासकर यांनी उमेदवारी माघारी घेतली होती. एकूण २६ अर्ज दाखल झाले होते. त्यापकी एक अर्ज अवैध ठरला होता तर एकूण सातजणांनी माघार घेतल्याने आता िरगणात १८ उमेदवार आहेत. सातारा लोकसभा मतदार संघासाठी हा आकडा उच्चांकी आहे. यापूर्वी ११ व्या लोकसभेच्या निवडणुकीत अर्थात १९९६ सालात १६ उमेदवार िरगणात होते आणि काँग्रेसच्या या पारंपरिक बालेकिल्ल्याला शिवसेनेच्या िहदुराव ना. िनबाळकर यांनी भगदाड पाडले होते. सध्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक प्रथमच अपक्ष म्हणून लढवली होती.
दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यावर महायुतीच्या उमेदवारीतून मुक्त केलेले संभाजी संकपाळ यांनी आपल्या भावनांना पत्रकारांसमोर वाट मोकळी करून दिली. आरपीआयमधील सातारा येथील स्थानिक नेत्यांवर म्हणजेच अशोक गायकवाड आणि किशोर तपासे यांच्यावर तोंडसुख घेतले. येथील काही नेत्यांनी आपल्याकडे पशाची अवास्तव मागणी केली आहे. खा. आठवले तसेच युतीच्या सर्व नेत्यांची भेट उमेदवारीपूर्वी घेतली होती. त्यांची माझ्या उमेदवारीस मान्यता होती. खा. आठवले यांनी सोशल इंजिनिअरींगच्या प्रयोगासाठी मराठा समाजातील माझी निवड केली होती. पण स्थानिक पातळीवर असणारा गोंधळ मोठय़ा प्रमाणात होता. माध्यमांशी मला बोलून दिले नाही. तसेच जिल्ह्यात माझा संपर्क सुरू असताना संपर्क नाही, असे सांगितले जात होते. केवळ व्यवस्था झाली का? असे प्रश्न विचारले जात होते. माझी शब्दश छळवणूक केली जात होती. एकटे पाडले जात होते. खा. आठवले यांना माझा अर्ज भरून घेण्याच्या दिवशी थांबायला लावले. एबी फॉर्म मागवून घेतला आणि दुसरे दिवशी गायकवाड यांचे नाव जाहीर केले. हा सगळा प्रकार मानसिक छळवणुकीचा होता. पक्षाला मी पसे दिले होते. स्थानिक नेत्यांना पसे दिले होते. निवडणुकीच्या आचारसंहितेत योग्य ठरेल तेवढा खर्च मी केला होता. मात्र स्थानिक नेत्यांकडून मी पसे वसूल करणार आहे, त्यांच्या घरापुढे आंदोलन करणार आहे, असे उद्गार संकपाळ यांनी काढले. मी मराठा आहे, मी समोरून लढेन, माझी उमेदवारी माघारी घेतली असली तरी येत्या दोन दिवसात मी कोणाला पाठबळ देणार हे जाहीर करेन, त्यांचा प्रचार करेन आणि त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असे संकपाळ शेवटी म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा