लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महाविकास आघाडीच्यावतीने चंद्रहार पाटील, स्वाभिमानीचे महेश खराडे, ओबीसी बहुजन आघाडीचे प्रकाश शेंडगे यांच्यासह १९ जणांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
स्वाभिमानीचे खराडे यांनी विश्रामबाग येथील क्रांती सिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोड्यावरून प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालयात जाउन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
आणखी वाचा-मोदी कंपनीला घालवण्याची सुरुवात सांगलीतून – खा. राऊत
तसेच माजी आमदार शेंडगे यांनी कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय उबाठा शिवसेनेचे डमी उमेदवार म्हणून जिल्हा संघटक दिगंबर जाधव, आमदार सुधीर गाडगीळ यांनी भाजपकडून डमी उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली. तसेच जालिंदर ठोमके, बाजीराव गवळी, दिव्या चंद्रहार पाटील, दत्तात्रय पंडित, बापू सुर्यवंशी, टिपू सुलतान सिकंदर पटवेगार, स्मिता यादव, आउद्दीन काझी, तोहित मोमीन आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.