रत्नागिरी : जयगड येथील जिंदाल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले असताना त्यातील १९ विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. या विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी दुपारनंतर या वायू गळतीचा दोन प्रोढांनाही त्रास होऊ लागला असून त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जिंदाल कंपनीत दुर्घटना घडल्यानंतर ७२ तासांनी या वायू गळतीचे वाईट परिणाम दिसू लागल्याने आता या भागातील नागरिकांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा…Chandrashekhar Bawankule : “मी त्यांची माफी मागतो”, चंद्रशेखर बावनकुळेंनी मागितली रामदास आठवलेंची माफी; कारण काय?

जिंदाल कंपनीत १२ डिसेंबर रोजी एलपीजी वायुगळती झाली. कंपनीच्या शेजारीच असलेल्या नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील ६५ विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी या विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार घेऊन विद्यार्थी घरी परतल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. काही विद्यार्थ्यांच्या छातीत दुखू लागले तर काहींच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली. असा त्रास होणा-या १९ विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७२ तासानंतर काही प्रोढांनाही त्रास होऊ लागल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा…Manoj Jarange : छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; “मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांना..”

यावेळी खासगी रुग्णालयाच्या आवारात पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक महिला चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. त्यांनी जिल्हा रूग्णालयात आमच्या मुलांवर उपचारच झाले नाहीत फक्त सलाईन लावली त्यामुळे मुलांना होणारा त्रास वाढला असल्याचे सांगितले. या कंपनीमुळे अशा घटना वारंवार घडणार असतील तर ही कंपनीचं बंद करावी, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.

Story img Loader