मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले आहे. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली आहेत. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते.

अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक, फडणवीसांच्या निवासस्थानी त्यांच्याभोवती फिरत होती अज्ञात व्यक्ती, मुंबई पोलिसांकडून अटक

Bollywood film stars in grip of mafia extortion
चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Saif Ali Khan Attack Updates kareena kapoor first reaction
सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर करीनाची पहिली पोस्ट! म्हणाली, “प्रचंड आव्हानात्मक दिवस…”
graphic representing the issue
Honor Killing : बापाने पोलिसांसमोरच पोटच्या मुलीवर झाडल्या गोळ्या, चार दिवसांवर आलं होतं लग्न; नेमकं काय घडलं?
Rohit Pawar angry on Fadnavis Govt as after 35 days Santosh Deshmukh killers not punished Brother Dhananjay protesting
“न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवण्यासाठी…”, धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर रोहित पवारांचा सरकारवर संताप
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
आलिशान गाड्या आणि बंदुकी बाळगण्याचा छंद; गोळीनेच जीव गमावलेले आमदार गुरप्रीत सिंग गोगी कोण होते? (फोटो सौजन्य पीटीआय)
आलिशान गाड्या आणि बंदुकी बाळगण्याचा छंद; गोळीनेच जीव गमावलेले आमदार गुरप्रीत सिंग गोगी कोण होते?
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

भाजपा नेते राम कदम यांनी याकुब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादाने घडतंय की मुंबई प्रेमातून? असा खोचक सवाल कदम यांनी विचारला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळात या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले, असा आरोप कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी माफी मागावी, अशी मागणी देखील कदम यांनी केला आहे.

फेसबुक लाईव्ह करत रस्त्यावर गोळीबार, १९ वर्षीय तरुणाला पोलिसांकडून बेड्या, अमेरिकेच्या मेम्फिस शहरातील घटना

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात याकुबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास १४०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते.

Story img Loader