जिल्हा बँकेत नोकरभरती व कलम ४२०च्या गुन्ह्य़ांत दोषारोप दाखल झाल्याची नोंद निवडणूक आयोगाला सादर करताना काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांनी त्यांची मिळकत ९ कोटी २३ लाख ७० हजार ९३० रुपये असल्याचे शपथपत्राद्वारे कळविले आहे.
निवडणूक लढविताना पाटील यांच्या हातावर १ लाख ६ हजार ६६८ रुपये, तर पत्नीकडे ४७ हजार ५७ रुपये आहेत. वेगवेगळ्या बँकांमध्ये ३ लाख ६५ हजार ३३३ रुपये असल्याचे विवरणपत्र देण्यात आले आहे.
उमेदवारांचे आर्थिक व्यवहार माहीत व्हावेत, म्हणून बँकांमधील बचत खात्यांची माहिती पहिल्या प्रपत्रांमध्ये भरली जाते. बॉण्ड्समध्ये १९ लाख ३३ हजार ३१० रुपये गुंतविले आहेत, तर पत्नीच्या नावे १ लाख ६८ हजार गुंतवणूक आहे. राष्ट्रीय बचतीचे ५ लाख १० हजार स्वतंत्रपणे असल्याचे शपथपत्रात नमूद आहे. कोटय़वधींची संपत्ती असणाऱ्या पाटील यांच्या नावे फक्त १ दुचाकी वाहन आहे. १ लाख ८४ हजार ३२१ रुपयांचे सोने स्वत:च्या नावे, तर पत्नीकडे ७ लाख २६ हजार २४२ रुपयांचे सोने असल्याचे नमूद केले. एकूण ५ कोटी ५४ लाख ४८ हजार २२४ रुपये किमतीची जंगम मालमत्ता त्यांच्या स्वत:च्या नावे, तर पत्नीच्या नावे २८ लाख ८० हजार ६८७ रुपये असल्याची नोंद आहे. कन्नड येथे जमीन असून त्याचे बाजारमूल्य ५ लाख ५६ हजार ९२० असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. वेगवेगळ्या बँकांकडून १ कोटी ३१ लाख ६३ हजार रुपयांचे कर्ज असल्याचे कळविले आहे. वाणिज्य शाखेचे पदवीधर असणाऱ्या पाटील यांच्या शपथपत्रातील नोकरभरतीच्या घोटाळ्याचे दोषारोपपत्र निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा असू शकेल.
उमेदवार नितीन पाटील सव्वानऊ कोटींचे धनी
जिल्हा बँकेत नोकरभरती व कलम ४२०च्या गुन्ह्य़ांत दोषारोप दाखल झाल्याची नोंद निवडणूक आयोगाला सादर करताना काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांनी त्यांची मिळकत ९ कोटी २३ लाख ७० हजार ९३० रुपये असल्याचे शपथपत्राद्वारे कळविले आहे.
First published on: 05-04-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 25 cr property of candidate nitin patil