शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या दोन दिवस आधीच एक पक्षांतर्गत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचा राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत शाब्दिक वाद झाला होता. विधान परिषदेच्या निवडणुकीच्याआधी पवईमधील रिनायसन्स हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची रहायची व्यवस्था करण्यात आली होती. याचवेळी एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांसोबत शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेकडे असणारी अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याच्या मुद्द्यावरुन या नेत्यांमध्ये वाद झाला. शिवसेनेची अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याला शिदेंचा विरोध होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना आवश्यक ती मतं मिळाली आणि ते विजयी झाले. मात्र काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. दहाव्या जागेसाठी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पहायला मिळाला आणि भाजपाने पाच जागा जिंकल्या.

नक्की वाचा >> भायखळा ते भंडारा अन् पैठण ते अंबरनाथ… एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या ३३ बंडखोर आमदारांची यादी पाहिलीत का?

“दोन दिवसांपूर्वी रिनायसेन्स हॉटेलमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. विधान परिषदेसाठी मतदान कशापद्धतीने केलं जावं याबद्दल चर्चा सुरु होती. याच मुद्द्यावरुन शिंदेंचे राऊत आणि आदित्य ठाकरेंशी मतभेद झाले. शिवसेनेची मतं वापरुन काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्याच्या कल्पनेला शिंदेंचा विरोध होता. याच मुद्द्यावरुन दोन्ही बाजूकडून जोरदार बाचाबाची झाली. त्या घटनेकडे आज पाहिल्यास याच वादामुळे बंड पुकारण्यात आल्यासारखं वाटतंय,” असं सुत्रांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदे प्रकरण : “गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी…”; भाजपाला ‘ईस्ट इंडिया कंपनी’ म्हणत शिवसेनेचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे हे मागील काही महिन्यांपासून राज्यामध्ये सुरु असणाऱ्या घडामोडी आणि राज्य सरकारच्या कारभारावर नाराज होते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही कल्पना देण्यात आली होती, असं सुत्रांनी म्हटलंय.

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

एकाच उमेदवाराला विजयी करण्याइतकी मतं असताना काँग्रेसने विधान परिषदेच्या रिंगणात दोन उमेदवार उतरवले होते. काँग्रेसने जारी केलेल्या यादीमध्ये हांडोरेंचं नाव हे पहिला उमेदवार म्हणून होतं. अनेकांना हांडोरे विजयी होतील असं वाटलं होतं आणि दुसरे उमेदवार भाई जगताप यांना विजय मिळणं कठीण आहे अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

नक्की वाचा >> राजकीय घडामोडींचा योगा’योग’ अन् खुर्ची! ऋषिकेश जोशीच्या पोस्टवर विश्वास नांगरे-पाटलांची कमेंट; म्हणाले, “भावा, खुर्ची…”

जगताप यांना मित्र पक्षांच्या मतांवर अवलंबून रहावं लागणार असल्याने त्यांचा विजय अनिश्चित मानला जात होता. मात्र जगताप विजयी झाले आणि हांडेरेंचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन तर भाजपाने पाच जागांवर विजय मिळवला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 days ago shinde had spat with raut and aaditya on votes for cong in mlc polls scsg