यवतमाळ- चंद्रपूर मार्गावर मोहदा गावाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन्ही ट्रकचालकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे वणी- यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही दिशेच्या मार्गांवरील वाहनांचा खोळंबा झाला आहे.
यवतमाळ- चंद्रपूर मार्गावर मोहदा गावाजवळ सकाळी साडे पाचच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मात्र, या अपघातामुळे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघातानंतर रस्ता बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली. दोन्ही ट्रक हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिची प्रशासनातर्फे देण्यात आली.