लातूर तालुक्यातील रस्त्याच्या सुधारणांसाठी शासन व नाबार्ड यांच्याकडून २० कोटी रुपये मंजूर झाले असून त्यामुळे काही प्रमाणात रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आमदार अमित देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. २०१३ च्या अर्थसंकल्पीय अनुदानातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. लातूर-कळंब, लातूर-बार्शी, हरंगुळ व अंबाजोगाई रस्त्यावरील उड्डाणपूल, लातूर-लोखंडी सावरगाव, गंगापूर-हरंगुळ, बाभळगाव-शिरसी आदी रस्त्यांवर हा निधी खर्च केला जाणार आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
लातूरच्या रस्त्यासाठी २० कोटी मंजूर
लातूर तालुक्यातील रस्त्याच्या सुधारणांसाठी शासन व नाबार्ड यांच्याकडून २० कोटी रुपये मंजूर झाले असून त्यामुळे काही प्रमाणात रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
First published on: 01-01-2013 at 05:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 crore aproved for latur road development