Petrol Diesel Price In Marathi : आज २० फेब्रुवारी २०२५ रोजी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजकाल अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमची वाढल्या की, त्याचा परिणाम आपल्या खिशावर आणि एकूणच महिन्याच्या बजेटवर होताना दिसतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर (Maharashtra Petrol Diesel Price) कमी असतील तर तुमच्या खिशावरील ताणदेखील कमी असतो. पण, आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलचर दर किंचित वाढल्याचे दिसून आले आहेत.
पेट्रोल-डिझेलचा दर (Maharashtra Petrol Diesel Price)
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.९४ | ९१.४५ |
अकोला | १०४.७१ | ९१.२५ |
अमरावती | १०५.१२ | ९१.६५ |
औरंगाबाद | १०५.०९ | ९१.५८ |
भंडारा | १०५.१४ | ९१.६८ |
बीड | १०४.८२ | ९१.३३ |
बुलढाणा | १०५.१५ | ९१.६८ |
चंद्रपूर | १०४.९२ | ९१.४७ |
धुळे | १०४.०२ | ९०.५६ |
गडचिरोली | १०५.२४ | ९१.७७ |
गोंदिया | १०५.४४ | ९१.९५ |
हिंगोली | १०५.५० | ९२.०३ |
जळगाव | १०४.११ | ९०.६५ |
जालना | १०५.५० | ९२.०३ |
कोल्हापूर | १०४.०९ | ९०.६६ |
लातूर | १०५.५० | ९२.०३ |
मुंबई शहर | १०३.५० | ९०.०३ |
नागपूर | १०४.०६ | ९०.६२ |
नांदेड | १०५.५० | ९२.०३ |
नंदुरबार | १०४.९७ | ९१.४८ |
नाशिक | १०४.७५ | ९१.२६ |
उस्मानाबाद | १०५.३४ | ९१.८५ |
पालघर | १०३.९२ | ९०.४३ |
परभणी | १०५.५० | ९२.०३ |
पुणे | १०३.८२ | ९०.३५ |
रायगड | १०३.७५ | ९०.२७ |
रत्नागिरी | १०५.५० | ९२.०३ |
सांगली | १०४.०२ | ९०.५९ |
सातारा | १०४.७९ | ९१.३९ |
सिंधुदुर्ग | १०५.५० | ९२.०३ |
सोलापूर | १०४.१५ | ९०.७० |
ठाणे | १०३.६८ | ९०.२० |
वर्धा | १०४.१७ | ९०.२० |
वाशिम | १०४.९० | ९०.७३ |
यवतमाळ | १०५.२८ | ९१.७९ |
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलच्या दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
मोबाईलवर चेक करा पेट्रोल-डिझेलचे दर (Maharashtra Petrol Diesel Price) :
एसएमएसच्या मदतीने तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर घरबसल्या चेक करू शकता. तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर तुम्हाला RSP सोबत सिटी कोड लिहून 9224992249 या नंबरवर पाठवा. तुम्ही बीपीसीएलचे ग्राहक आहात तर तुम्हाला RSP लिहून आणि 9223112222 या नंबरवर पाठवलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमतीबद्दल माहिती मिळेल. तुम्ही HPCL चे ग्राहक असाल, तर तुम्ही HP Price टाइप करून 9222201122 या क्रमांकावर पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती SMS द्वारे मिळतील…
२५ लाखांच्या एसयूव्हीचे फीचर्स मिळतील १४ लाखांत :
२०१९ मध्ये लाँच झालेली हेक्टर (Hector) ही ‘एमजी मोटर’ची भारतातील पहिली एसयूव्ही कार आहे. ही कार ५ सीटर एसयूव्ही म्हणून बाजारात आणली. नंतर सहा व मग सात सीटरची एसयूव्हीसुद्धा लाँच करण्यात आली. हेक्टर एसयूव्ही पाच सीटरची किंमत १३,९९,८०० ते २२,५६,८०० रुपये (एक्स-शोरूम)दरम्यान, हेक्टर प्लस एसयूव्ही सहा सीटरची किंमत १७,४९,८०० ते २३,४०,८०० रुपये तर हेक्टर प्लस सात सीटरची किंमत १७,४९,८०० ते २३,१९,८०० रुपये (एक्स-शोरूम) आहे.