चिकलठाणा एमआयडीसीतील एका विद्युत मोटारी दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिक केंद्राला बुधवारी भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमुळे जवळच्या दोन-तीन कंपन्यांचेही नुकसान झाले.
चिकलठाणा एमआयडीसीतील ई-५२ ब्लॉक नंबर सी १२८ टायनी इंडस्ट्रीतील ग्लोबल इलेक्ट्रिकल सर्विसेस असे आग लागलेल्या केंद्राचे नाव आहे. नंदकिशोर व आकाश पठाडे यांचे हे केंद्र आहे. आग शार्टशर्कीटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यात मोटारी दुरुस्तीसाठी खरेदी केलेल्या इलेक्ट्रिकल साहित्याचे मोठे नुकसान झाले. एमआयडीसी पोलीस पंचनामा केला.
हेही वाचा- सांगली : पाच दिवस चकवा देणाऱ्या सांबराला पकडण्यात वनविभागाला यश
केंद्राचे संचालक नंदकिशोर पठाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कष्टाने युनिट उभे केले होते. इतर साहित्य मशनीरासाठी कर्ज काढले होते. हे कर्जाची परतफेड केली. आता मोठे संकट ओढवले असले तरी यातून उभे राहून आमच्या ग्राहकांचे नुकसान होऊ न देता काम करून दिले जाईल, असेही पठाडे म्हणाले.