अतिवृष्टीमुळे विदर्भात नद्यांना आलेल्या पुरात २०० हून अधिक  जणांचे बळी गेले आहेत. पकी यवतमाळ जिल्ह्य़ात २९ जण मृत पावले, तर २ हजाराहून अधिक जनावरे दगावली आहेत. या नुकसानग्रस्तांना केंद्र शासनाकडून योग्य मदत मिळावी, यासाठी आपण पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली असून नुकसानग्रस्तांना योग्य मदत केली जाईल, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
 विदर्भात ६.५० लाख हेक्टर शेतजमीन बाधित झाली, तर अनेक घरे   उध्वस्त झाले आहेत. नुकसानीचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाकडून सुरू असून १ हजार ९८५ कोटी रुपयांची विदर्भाला गरज असल्याचे प्राथमिक अंदाजातून स्पष्ट होते. विदर्भातील अंदाजे ६५० कि.मी.चे रस्ते, ८०० मोठे पूल, ७०० लहान पुलांचे नुकसान झाले आहे.

Story img Loader